Jalgaon Lok Sabha Election  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : आता ‘बेड’वरील ज्येष्ठांना पोस्टल मतदानाचा पर्याय; हेळसांड थांबणार

Lok Sabha Election : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग विविध उपाय करतात. ज्येष्ठ नागरिक वृध्दत्वामुळे मतदानाकडे पाठ फिरवितात.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग विविध उपाय करतात. ज्येष्ठ नागरिक वृध्दत्वामुळे मतदानाकडे पाठ फिरवितात. काहीजण बेडवर असतात. त्यांना मतदान करता येत नाही. अशांसाठी निवडणूक आयोगाने यंदापासून पोस्टल मतदानाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी त्या व्यक्तीचे वय ८५ वरील असावे, आणी तो बेडवर झोपून असावा ही अट आहे. तरच त्यांना पोस्टल मतदानाचा अधिकार असेल. (Jalgaon Lok Sabha Election postal voting for seniors on bed marathi news)

लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीत अनेक ठिकाणी कार्यकर्ते ज्येष्ठांना मतदानासाठी आपल्या पाठीवर बसवून, सायकलीवर बसवून, कोणी मोटार सायकलीवर बसवून मतदानासाठी नेताना आपण पाहतो. कोणी अपंग असल्यास त्याला चारचाकी सायकलवरून मतदान केंद्रात आणले जाते.

काही ठिक़ाणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ज्येष्ठांना मतदानासाठी जावे यासाठी त्यांना विविध साधनांची उपलब्धता करून देतात. चमकोगिरी करून ज्येष्ठांना आपण कशी मदत करतो हे दाखवितात. मात्र आता निवडणूकीत ज्येष्ठांना विशेष करून जे आजारी, अपंग आहेत, अशासाठी घरी बसल्या पोस्टल मतदानाची सोय निवडणूक आयोगाने केली आहे. (latest marathi news)

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर संबंधित ज्येष्ठांना मतदानासाठी पर्याय निवडण्याबाबतचा अर्ज दिला जाणार आहे. ज्यात ते घरून पोस्टल मतदान करणार की मतदान केंद्रात येवून मतदान करणार याची माहिती संकलीत केली जाणार आहे. तो अर्ज भरून संबंधित बी.एल.ओ.किंवा निवडणूक कार्यालयात येवून द्यावा लागणार आहे.

त्यावरून किती बेडवरील ज्येष्ठ नागरिका पोस्टल मतदान करतील याची माहिती होवून त्यांना संबंधित यंत्रणा पुरविली जाणार आहे. ती यंत्रणा गोपनीय पध्दतीने काम करेल. जिल्ह्यात ८० वर्षांवरील वयोमान असलेले १ लाख ३ हजार १२९ मतदार आहेत. त्यातील बेडवर असलेल्यांसाठी पोस्टल मतदानाची सोय आहे.

''८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक त्यात जे आजारी असून त्यांना जागेवरून हलताही येत नाही अशांसाठी पोस्टल मतदान पध्दत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल. त्यात ते पोस्टल मतदान करणार कि मतदान केंद्रावर येणार याची माहिती घेवून पुढील कार्यवाही होईल.''-अरविंद अंतूर्लीकर उप जिल्हा निवडणूक अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT