Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : निवडणुकीच्या चाहुलीने पुढारी कार्यकर्त्यांच्या संपर्कात!

Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने राजकीय नेत्यांची घालमेल सध्या वाढलेली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

अमोल महाजन

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने राजकीय नेत्यांची घालमेल सध्या वाढलेली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यासोबतच दुष्काळाचे चटकेही वाढू लागले असून, ग्रामीण भागात आता उन्हाबरोबरच राजकारणही तापू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकांच्या राजकीय गणितांची चर्चा मात्र सध्या जोरात सुरू आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

अनेक सार्वजनिक कार्यक्रमात याची झलक दिसू लागली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांवर टीका सुरू झाली आहे. आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल का, मिळाल्यास समोर कोण असेल, आपल्याच पक्षातील किंवा आघाडी-युतीतील एखादा बंडखोर आव्हान उभा करेल का, या प्रश्‍नांनी निवडणुकीसाठी सज्ज असलेले नेते हैराण झाले आहेत. त्यात ते वैतागातून एकमेकांवर वाट्टेल तशी टीका-टिप्पणी करीत आहेत.

पूर्वी गावच्या पारावर रंगणाऱ्या चर्चा आता सोशल मीडियावर जोरात सुरू झाल्या आहेत. तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियातून एकमेकांचे उणेदणे काढत आहेत. गावोगावी नेत्यांची अधिकृत- अनधिकृत सोशल मीडिया फौजच जणू तयार झाली आहे. या प्रकारांमुळे जिल्ह्यात सर्वत्र राजकीय वातावरण तापलेले आहे. नेत्यांच्या अगोदर ही फौजच एकमेकांवर चालून जात आहे. (latest marathi news)

विधानसभेसाठी फिल्डींग!

जिल्ह्यातील अनेक राजकीय स्पर्धकही एकमेकांवर अगदी तुटून पडले आहेत. यातून कार्यकर्त्यांमध्ये अनेक वादविवाद सुरू झाले आहेत. नेत्यांची एखाद्या सभेत किंवा कार्यक्रमप्रसंगी एकमेकांच्या विरोधात बोलताना जीभ घसरत आहे. एकीकडे राजकीय पुढारी गावोगावी फिरून कार्यकर्त्यांशी जोरदार संपर्क दौरे करीत आहे.

तर काही ठिकाणी एकाच पक्षातील नेत्यांमध्ये मोठी दुफळी तयार झाली असून, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. लोकसभेचे गणित लक्षात घेता विधानसभा निवडणुकांसाठी नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामधून अनेक गमती-जमती होत आहेत.

प्रचारदौऱ्यांचे नियोजन

काही नेते आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या कार्यक्रमाला दांडी मारत आहेत. कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. प्रत्येक तालुक्यात किमान चार-पाच तगडे इच्छुक उमेदवार असल्याने राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. काही नेत्यांनी तर आतापासूनच आपणच आगामी विधानसभेचे उमेदवार असल्याचे घोषित करीत प्रचारदौरे वाढवले आहेत. तर काही ठिकाणी तगड्या राजकारण्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र पाहावयास मिळत आहे. राजकीय वातावरण असे रंगले असताना यात आता मात्र उन्हाळाही जाणवू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT