Raksha Khadse , Dr. Satish Patil esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : ‘रावेर’च्या मैदानात खडसेंविरुद्ध डॉ. पाटील यांची तयारी

Jalgaon Lok Sabha Election : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदार संघ मोठ्या विश्‍वासाने पक्षाकडे घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदार संघ मोठ्या विश्‍वासाने पक्षाकडे घेतला आहे. त्यांनी विश्‍वासाने उमेदवारी देवूनही एकनाथ खडसे तब्येतीच्या कारणामुळे नकार देत असतील तर या मतदारसंघातून आपण उमेदवारी लढण्यास तयार आहोत. केवळ कोणी उमेदवारी घेत नाही म्हणून आपण लढतोय असे नव्हे; तर आपली निवडून येण्याची धमकही आहे, असा दावा माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

जळगाव जिल्ह्यात रावेर व जळगाव दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीत जळगाव मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्याने पेच निर्माण झाला आहे.

या मतदार संघातून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र गटातर्फे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र आता त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण तब्येतीमुळे लढू शकत नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.

पक्षातर्फे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप पक्षातर्फे उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात आले. (latest marathi news)

रावेरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या लढतीत आता पक्षाचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनीही उडी घेतली आहे. पक्षातर्फे ज्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता,ते जर नकार देत असतील तर आपण या मतदार संघातून लढण्यास तयार आहोत असा दावाडॉ. पाटील यांनी केला आहे.

ॲड.पाटील, चौधरीच्याही सोबत

रावेर लोकसभा मतदार संघातून ॲड.रविंद्र पाटील व संतोष चौधरी यांच्या नावाची पक्षाकडे चर्चा सुरू आहे. दोन्हीही चांगले उमेदवार आहेत. दोघांनीही तयारी दाखविली आहे. जर त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर आपण त्यांचा प्रचार करण्यास तयार आहोत, परंतु पक्षाने आपल्याला संधी दिली तर ते आपल्या साथीला असतील याचाही आपल्याला विश्‍वास असल्याचे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT