Sanjay Raut
Sanjay Raut esakal
जळगाव

Sanjay Raut : राज्यातील सर्वांत मोठी ‘गद्दारी’ जळगाव जिल्ह्यात : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पानटपरीवर बसलेल्यांना बाळासाहेबांनी आमदार, मंत्री केले, पण अशांनीच गद्दारी केली. राज्यातील सर्वांत मोठी गद्दारी जळगाव जिल्ह्यात झाली असून, त्यासाठी या गद्दारांनी २५० खोके घेतलेय, अशी टीका शिवसेना ‘उबाठा’चे नेते संजय राऊत यांनी बुधवारी (ता. २४) केली. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. (Jalgaon Lok Sabha Election)

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे करण पाटील यांनी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे रावेर लोकसभा मतदारसंघात उद्योजक श्रीराम पाटील यांनी अर्ज दाखल केला. दोन्ही उमेदवारांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली. त्यात कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक बैलगाडीसह सहभागी झाले होते.

शिवतीर्थ मैदानापासून रॅलीस सुरवात झाली. एका वाहनावर महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार व नेते उपस्थित होते. या वेळी झालेल्या सभेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खासदार संजय राऊत, माजी मंत्री अरुणभाई गुजराथी.

माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, कैलास पाटील, संदीप पाटील, वंदना पाटील, उमेश पाटील, निळकंठ फालक आदी उपस्थित होते. (Latest Marathi News)

महाराष्ट्र भाजपला लुटायचा होता : राऊत

खासदार राऊत म्हणाले, की महाराष्ट्र भाजपला लुटायचा होता. त्याला आम्ही विरोध केला, म्हणून त्यांनी पक्ष फोडला. आम्हाला जेलमध्ये टाकले. मोदी चारशे पारचा ‘नारा’ देताहेत. मात्र, जनता भाजपला ‘हद्दपार’ केल्याशिवाय राहणार नाही. मोदी, शहांना मुंबई गुजरातमध्ये न्यायची आहे. सावध व्हा. दहा वर्षांत दोन लाख नोकऱ्याही दिल्या नाहीत यांनी. देशही सुरक्षित नाही.

ही भाजपविरोधी लाट : जयंत पाटील

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की एवढ्या उन्हातही मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. यावरून ‘भाजप’विरोधी लाट आहे. भाजपच्या हातातून सत्ता जातेय, असे चित्र सर्वत्र आहे. महागाईने सर्वसामान्य त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या कापूस व शेतमालाला दर मिळत नाही. दुसरीकडे खते, बियाण्यांच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांना पीकविम्यांचा परतावा मिळत नाही. देशात शेतकऱ्यांचे तुमच्या आमच्या मनातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना लागणारा जीएसटी रद्द करू.

पानटपरीवाल्याला पुन्हा पानटपरीवर बसवा

खासदार राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, की त्या पानटपरीवाल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार केले. नंतर मंत्री केले होते. त्यांनी गद्दारी केली. ४ जूननंतर त्यांना पुन्हा पानटपरीवर बसावे लागणार आहे.

खडसेंचा विषय जुना : पाटील

या दौऱ्यावेळी जयंत पाटलांना एकनाथ खडसेंच्या राजीनामा व भाजपतील प्रवेशाबाबत विचारले असता, त्यांनी हा विषय आता जुना झाला आहे. काहीतरी नवीन विचारा, असे सांगून बोलणे टाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT