Sri Kapileshwar Temple. esakal
जळगाव

Maha Shivratri Festival : कपिलेश्‍वर मंदिराचा आजपासून यात्रोत्सव! फुलणार भक्तीचा मळा

Jalgaon News : सुमारे पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली असून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे

सकाळ वृत्तसेवा

कळमसरे (ता. अमळनेर) : अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या खानदेशातील पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले नीम (ता. अमळनेर) जवळील कपिलेश्वर महादेव मंदिराचा यात्रोत्सव शुक्रवारपासून (ता. ८) महाशिवरात्रीच्या पर्वावर सुरु होत आहे. सुमारे पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली असून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. (jalgaon Maha Shivratri Festival Kapileshwar Temple marathi news)

जळगाव धुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेले व तब्बल एक हजार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला तापी, पांझरा आणि गुप्तगंगा नदी असून या त्रिवेणी संगमावर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी ऋषी कपिलमुनींनी तपस्या करून शिवलिंगाची स्थापना केल्याचे स्कंदपुराणात म्हटले आहे.

याठिकाणी मंदिराचे मठाधिपती हंसानंदजी महाराज यांनी २००५ साली अखिल भारतीय संत संमेलन भरविले होते. यावेळी भारतातून संत महंतनी हजेरी लावल्याने कळमसरेसह परिसरातील भूमी पावन झाली आहे. मंदिराला लागूनच अनिरुद्धबापूंचा आश्रम आहे.

याठिकाणी दर शनिवारी व रविवारी मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असल्याने या निसर्गाच्या सान्निध्यात भाविकांची मांदियाळी असते. याच ठिकाणी मठाधिपती हंसानंद महाराजांनी लहान बालकांसाठी मठ व वेधशाळा सुरू केली आहे. मंदिरावर वर्षभर मोठमोठे पूजाविधी शांती तसेच धार्मिक, सामाजिक कार्यक्रम सुरू असतात. महाशिवरात्रीला मोठा यात्रोत्सव भरविला जातो.

तीन शिवलिंगांची स्थापना

मंदिरात तीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले असून हे मंदिर गोल घुमटाकार कोरीव हेमाडपंथी जागृत स्वयंभू अशा स्वरूपाचे आहे. सकाळच्या प्रहरातील सूर्योदयाची पहिली सूर्यकिरणे थेट मंदिरातील शिवलिंगावर पडतात, अशी या मंदिराची उत्कृष्ट कलेचा आविष्कार असलेली कलाकृती आहे.

दरम्यान, यात्रोत्सवानिमत्ताने पाळणे, उपहारगृहे, संसारोपयोगी वस्तू, खेळण्याची दुकाने थाटली आहेत. अमळनेर आगाराने भाविकांना जाण्यासाठी जादा बसेसची सोय केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या मंदिरासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून दोन कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (ता. ८) फराळाचे वाटप केले आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडलेश्वर मठाधिपती हंसानद महाराज व मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT