Attack on corporator who says don't crowd the Corona survey 
जळगाव

कोरोना सर्वेक्षणाला गर्दी नका करुन म्हणणाऱ्या नगरसेवकावर हल्ला 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव :- शहरातील पिंप्राळा हुडकोतील ख्वॉंजा नगर येथे कोरोना सर्वेक्षण प्रसंगी गर्दी करणाऱ्यांना नगरसेवकाने हटकल्याने त्यावरून वाद होऊन नगरसेवकासह त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने महापालिका आरोग्य विभागासह डॉक्‍टर सर्वेक्षणासाठी बुधवार (ता.3)दुपारी पिंप्राळा हुडको भागात आले होते. परिसरातील रहिवाशांनी यावेळी गर्दी केल्याने विद्यमान नगरसेवक शफी शेख यांनी गर्दी करणाऱ्यांना हाकलून लावल्याचा राग येऊन हसन शेख अफजल याला राग येऊन त्याने व त्याच्या आईने नगरसेवकाचा भाऊ व त्याच्या आईला मारहाण केल्याची घटना घडली. याची अदखलपात्र तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे. पोलिसांत तक्रार दिली म्हणून संध्याकाळी हसन शेख अफजल, कामरान शेख रऊफ अब्दुल, राजा शेख अलीम, अलीम शेख युसूफ अशांनी लोखंडी रॉड. पाईप व लाठ्या काठ्यांनी नगरसेवक शफी शेख यांच्या घरावर हल्ला चढवला त्यात नगरसेवक शफी शेख, जमील शेख यांच्यासह इतर जखमी झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे. दोन्ही तक्रारीवरुन परस्पर विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसऱ्या गटातील तक्रार 
मारहाणीत जखमी जमील सलीम शेख याने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्या नूसार शफी शेख शरीफ शेख, आसिफ शेख, मुश्‍ताक खान नासीर खान, भिक्‍या शेख आबिद अशांनी हल्ला चढवून लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्या प्रकरणी जमखीच्या तक्रारीवरून त्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT