crime 
जळगाव

जळगावः उमर्टीत..गावठी कट्ट्याचा अड्डा उद्ध्वस्त

ग्रामीण पोलिसांच्या मदतीने गावठी कट्ट्यांच्या धंद्याला लगाम लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सकाळ वृत्तसेवा


चोपडा : उमर्टी येथील गावठी कट्टे बाळगणारा ग्रामीण पोलिसांच्या (Police) ताब्यातील संशयित सतनामसिंग महारसिंग जुनेजा (वय २२) याला सोबत घेऊन चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी हृषीकेश रावळे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवीदास कुनगर व त्यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील उमर्टी येथील सतनामसिंग जुनेजा याच्या घरात जाऊन घरातील गावठी कट्टा बनविण्याचे साहित्य वरला पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले.


मध्य प्रदेशातील उमर्टी येथून देशात सर्वत्र चोपडामार्गे गावठी कट्टे पार्सल होतात; परंतु आजपर्यंत गावठी कट्टा बनविण्याच्या अड्ड्याचा पोलिसांना थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, या वेळी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तीन दिवसांपूर्वी स्वतःजवळ तीन कट्टे घेऊन जात असताना नाशिक येथील पोलिस पथकाने ताब्यात घेतलेला संशयित सतनामसिंग जुनेजाला सोबत घेऊन तो राहत असलेल्या मध्य प्रदेशातील घरात गावठी कट्टा बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त करून चोपडा ग्रामीण पोलिस व शहर पोलिसांनी कट्टा बनविणारे साहित्य मध्य प्रदेशातील वरला पोलिसांच्या मदतीने जप्त केले आहे.

ही पोलिसांची मोठी कारवाई असून, येणाऱ्या काळात पोलिस उपविभागीय अधिकारी रावळे व शहर, ग्रामीण पोलिसांच्या मदतीने गावठी कट्ट्यांच्या धंद्याला लगाम लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या कारवाईत चोपडा ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, शहराचे पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा उपस्थित होता. दरम्यान, या गुन्ह्यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : राहुल गांधी कोण आहेत हे भारतातील जनतेला माहित आहे - फडणवीस

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT