Police arrest Patil while accepting bribe of Rs 3,000
Police arrest Patil while accepting bribe of Rs 3,000 
जळगाव

प्रियकराच्या युक्तीने लाचखोर पेालिस पाटलास बेड्या

रईस शेख

जळगाव ः- प्रेम प्रकरणात देाघांतील वाद झाल्याने प्रकरण चव्हाट्यावर आले. घडला प्रकार पोलिसांना सांगितला तर, तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल होईल. पोलिसांपर्यंत प्रकरण जाणार नाही व गुन्हा दाखल होऊ नये या करिता विरवाडे आता.चोपडा येथील पेालीस  पाटील महारु कोळी याने तीन हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी त्याला अटक करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील पंचवीस वर्षीय तरुणाचे गावातीलच एका मुलीवर प्रेम आहे. प्रेम प्रकरणात देाघांमध्ये वाद उदभवल्याने याची कुणकुण पोलिस पाटील महारु हरी कोळी (वय-४०) याला होती. घडला प्रकार पेालिसांना सांगितला तर, तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल होईल,तुला अटकही करण्यात येईल अशी धमकी देत पोलीसांना  माहिती न देण्यासाठी महारु कोळी याने तक्रारदार तरुणाला लाचेची मागणी केली होती. तरुणाने जळगावला येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोलीस  पाटला विरुद्ध लेखी तक्रार दिल्यावरून डीवायएसपी गोपाल ठाकूर यांच्या पथकातील निरीक्षक निदेश लोधी, संजोग बच्छाव, नासिर देशमुख, ईश्‍वर धनगर अशांच्या पथकाने सापळा रचला, पंचाच्या समक्ष पोलीस पाटील महारु हरी कोळी याने तक्रारदार तरुणाकडून ३ हजार रुपये लाच स्वीकारताच त्याला ताब्यात घेत. पेालिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत.
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT