लॉकडाऊनच्या बेरोजगारीने घेतला गृहस्थाचा बळी  
जळगाव

लॉकडाऊनच्या बेरोजगारीने घेतला गृहस्थाचा बळी 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव, :- कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन मुळे गेल्या तीन महिन्यापासून काम नसल्याने निराशेच्या मानसिक मनःस्थितीत एका सत्तेचाळीस वर्षीय गृहस्थाने गळफास घेत मृत्यूला कवटाळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री पिप्राळा विद्या नगरात घडली. गौतम प्रल्हाद अहिरे (वय 47 )असे मृताचे नाव आहे. रामानंदनगर पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. जीवनावश्‍यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यवसाय, कंपन्या, हॉटेल बंद आहेत.परिणामी या उद्योगावर उपजीविका भागवणारे कामगार, हातमजूर गेल्या तीन महिन्यापासून घरी आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा या काळजीतून गौतम अहिरे हे काही दिवसांपासून नैराश्‍यात होते. विद्यानगरात आई वडील, भाऊ अशासह ते मागच्या बाजूला पत्नी, दोन मुलीसह स्वतंत्र राहत होते. शनिवार (ता.20)च्या मध्यरात्री नंतर पत्नी व मुली झोपेत असतांना गौतम यांनी साडीने गळफास घेत आत्महत्या केली. रात्री पत्नीला जाग आल्यानंतर गौतम यांनी गळफास घेतल्याचे पाहताच त्यांनी आक्रोश केला. घराच्या पुढच्या बाजूला राहत असलेला मोठा भाऊ संजय तसेच त्यांच्या पत्नी व इतरांनी तत्काळ धाव घेतली. त्या नंतर गौतम यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यावर गौतम यांना मृत घोषित केले.मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भोळे यांनी दिलेल्या खबरीवरून रात्री 01.45 वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गौतम यांची मोठी मुलगी विवाहित असून दोन मुली अविवाहित आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, भाऊ, आई वडील असा परिवार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT