Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Jalgaon Market Committee Election : वर्चस्वासाठी दोन गुलाबरावांची कसोटी

कैलास शिंदे

Jalgaon News : जळगाव बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीत उद्या (ता.२६) प्रचाराचा अंतिम दिवस आहे. समितीवर वर्चस्वासाठी विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यात लढत आहे. प्रचारात दोघांनी आपली ताकद पणाला लावली आहे. (Jalgaon Market Committee Election current minister Gulabrao Patil and former minister Gulabrao Deokar are fighting for supremacy news)

जळगाव बाजार समितीच्या संचालकपदासाठी शुक्रवार (ता.२८) रोजी मतदान होत आहे. उद्या प्रचाराचा अंतिम दिवस आहेत. बाजार समितीत विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सहकार विकास पॅनल तर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल यांच्यात लढत आहे.

बाजार समितीत सद्या गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती, त्यावेळी भाजप व शिवसेना (उबाठा) सोबत होती. मात्र शिवसेना पक्षफुटीनंतर समीकरण बदलले आहे. भारतीय जनता पक्ष आता शिंदे गटासोबत आहे. तर शिवसेना (उबाठा) गट कॉंग्रेस, राष्ट्रवादी सोबत आहे.

जळगाव बाजार समितीत जळगाव ग्रामीण मतदार संघाचा मोठा भाग आहे. त्यामुळे या मतदार संघाचे विद्यमान आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी आमदार व माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाची खरी लढत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पालकमंत्री पाटील यांना बाजार समितीवर सत्ता कायम ठेवण्याचे तर माजी मंत्री देवकर यांना सत्ता काबीज करण्याचे आव्हान आहे. दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचाराचा राळ उठविली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बैठक दोन्ही गटातर्फे घेण्यात येत आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार विकास पॅनलच्या प्रचारात राजेंद्र चव्हाण, आमदार सुरेश भोळे (भाजप), शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नीलेश पाटील, भरत हिम्मत पाटील आदी सोबत आहेत.

पॅनलतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी हिताच्या निर्णयासाठी आम्ही बांधील असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीत त्यांच्या मालाला चांगला भाव तसेच त्यांना चांगला सुविधा देण्यात येतील तर उपबाजाार समित्या बळकट करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

तर शेतकरी विकास गुलाबराव देवकर यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारात श्‍यामकांत सोनवणे, सुनील महाजन, लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर, वाल्मीक पाटील आदी सहभागी आहेत. पॅनलतर्फे गुलाबराव देवकर यांनी बाजार समितीत शेतकरी हिताच्या निर्णयाबरोबरच शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा दाम ताबडतोब मिळण्यासह इतर चांगल्या सुविधांचीही हमी दिली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलचा मेळावा आज जळगावात पार पडला, तर गुलाबराव देवकर यांच्या शेतकरी विकास पॅनलचा मेळावा उद्या होत आहे. अंतिम टप्प्यात प्रचाराला वेग आला असून दोन्ही गुलाबरावांनी बाजार समितीत वर्चस्वासाठी कंबर कसली आहेत. मतदार कोणाला कौल देणार व कोण बाजी मारणार हे रविवार (ता. ३०) रोजीच निकालात दिसून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT