Jalgaon Municipal Corporation News esakal
जळगाव

Jalgaon Mayor Jayshree Mahajan Statement : घनकचरा प्रकल्पाबाबत 15 दिवसांत निर्णय घ्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर आहे. डंपिंग ग्राउंडच्या परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या, असे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात महापौर जयश्री महाजन यांनी बुधवारी (ता. ९) सतराव्या मजल्यावरील दालनात बैठक घेतली. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता एम. जी. गिरगावकर, सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले आदी उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. तसेच यासाठी नियुक्त केलेला औरंगाबाद येथील मक्तेदार लक्ष्मी एजन्सीच्या अडचणीसंदर्भातही माहिती घेतली. मक्तेदाराने स्टीलचे भाव वाढल्यामुळे भाववाढ देण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागणीनुसार शासनाला पत्र देण्यात आले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. (Jalgaon Mayor Jayshree Mahajan Orders to municipal corporation Takes a decision on solid waste project within 15 days Jalgaon News)

तातडीने निर्णय घ्या

शासनाकडे भाववाढ देण्याबाबत प्रस्ताव पाठविला असला, तरी आता शासनाच्या उत्तराची प्रतिक्षा न करता तातडीने त्यावर काय उपायोजना करता येईल याचा आढावा घ्या. आवश्‍यकता असेल महापालिका निधीतून त्यांना वाढ देऊन तातडीने हा प्रश्‍न मार्गी लावा. मक्तेदाराला पाचारण करून त्याला १५ दिवसांत काम सुरू करण्याबाबत निर्णय घ्या, असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कचरा विलगीकरण प्रात्याक्षिक

शहरातील कचरा थेट वाहनातच विलगीकरणाचे यंत्र पुणे येथील एका कंपनीने तयार केले आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनीत्याची माहिती महापौर व अधिकाऱ्यांना दिली. कंपनीचा राज्यात हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे त्याचे प्रात्याक्षिक पाहिल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT