MLA Chandrakant Patil
MLA Chandrakant Patil  esakal
जळगाव

Jalgaon News : पुनर्वसित घरांना शासनाचा 'हिरवा कंदील' : आमदार चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : हतनूर प्रकल्पाच्या ‘बॅक वॉटर’मुळे अंशतः बाधित झाल्याने मुक्ताईनगर शहराचे चार टप्प्यांत पुनर्वसन करण्याचे नियोजन प्रशासनाने केलेले होते. पुनर्वसनातील पहिले तीन टप्पे पूर्ण झाले आहेत तर उर्वरित चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील जुने गावठाण परिसराचे पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडलेले होते.

दरम्यान, चौथ्या टप्प्यातील ४१३ घरांना राज्य शासनाच्या नियामक मंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. (Rehabilitation of 413 houses by regulatory body of state government)

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या समवेत मंत्रालयामध्ये वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. त्यानुसार शहरातील जुने गावठाणातील उर्वरित ४१३ घरांच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

आता याला अंतिम स्वरूप आले असून, राज्य शासनाच्या नियामक मंडळाने याला मान्यता दिली असल्याचे व उर्वरित रखडलेल्या गावांचे देखील पुनर्वसन लवकरच होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

मुक्ताईनगर शहरातील ४१३ घरांचे तसेच रावेर तालुक्यातील तापी व पूर्णा नदीवरील नागरिकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित घरांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून अधिवेशनात देखील लक्षवेधी मुद्दा उपस्थित करून आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता.

त्यानुसार १५ फेब्रुवारीला परिपत्रक जारी झाले असून, त्यात म्हटले आहे, की तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या २८ डिसेंबरला झालेल्या बैठकीनुसार ठराव करून तालुक्यातील मुक्ताईनगर (४१३ घरे) व रावेर तालुक्यातील नेहेते (१२८ घरे), वाघाडी (४६३ घरे).

ऐनपूर (२५० घरे), भामलवाडी (१९९ घरे) यांचे संपादन व पुनर्वसन करण्यासाठी ३०१.३७ कोटीच्या खर्चास शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणे व त्यासाठी आवश्यक निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव नियामक मंडळाच्या शिफारशीसह शासनास सादर करण्यास नियामक मंडळाची मान्यता देण्यात येत आहे, असे म्हटलेले आहे.

बॅकवॉटरमुळे १,६६४ घरे बाधित

१९७५-७६ मध्ये हतनूरच्या बॅकवॉटरमुळे मुक्ताईनगरातील १ हजार ६६४ घरे बाधित झाली होती. त्यात पुनर्वसनाचे आतापर्यंत तीन टप्पे करण्यात आले.

पहिला टप्पा १९७६ मध्ये झाला. त्यात ८८८ घरे उठविण्यात आली. दुसरा टप्पा १९८६ मध्ये १२३ घरांचा होता. तर तिसरा टप्पा २०१२ मध्ये २४० घरांचा होता. आता चौथ्या टप्प्यात ४१३ घरांचे पुनर्वसन होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT