rohit pawar  esakal
जळगाव

Jalgaon Rohit Pawar : आमदार रोहित पवार उद्या चोपड्यामध्ये

Rohit Pawar : मालापूर येथे आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपणारा उत्सव म्हणजेच भोंगऱ्या बाजाराच्या उद्‌घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार मंगळवारी (ता. १९) येथे येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rohit Pawar : मालापूर येथे आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपणारा उत्सव म्हणजेच भोंगऱ्या बाजाराच्या उद्‌घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार मंगळवारी (ता. १९) येथे येणार आहेत. डॉ. चंद्रकांत बारेला यांनी आज त्यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आमदार पवार यांचे सकाळी दहाला अरुण गुजराथी यांच्या निवासस्थानी आगमन होईल. (Jalgaon MLA Rohit Pawar in Chopda tomorrow marathi news)

साडेअकराला डॉ. बारेला यांच्या घरी आदिवासी पेहराव परिधान करतील. दुपारी बाराला जनसेवा हॉस्पिटलशेजारीच कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर मालापूर गावाकडे भोंगऱ्या बाजाराच्या उद्‌घाटनासाठी रवाना होतील. (latest marathi news)

पक्षाचे नेते अरुण गुजराथी, माजी मंत्री एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, सुनील भुसारा, जयंत वानोळे, रवींद्र पाटील, उमेश पाटील, रोहिणी खडसे, वंदना चौधरी यांच्यासह नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. बारेला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी चोपडा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अतुल ठाकरे, समाधान माळी, सचिन दाभे, अमोल राजपूत, राजन पवार उपस्थित होते. या उत्सवातील आदिवासी संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी यावे, असे आवाहन डॉ. बारेला यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT