MP Raksha Khadse  esakal
जळगाव

Jalgaon News : रावेर रेल्वेस्थानकात 10 कोटींतून विकासकामे : खासदार रक्षा खडसे

Jalgaon : अमृत भारत योजनेंतर्गत येथील रेल्वेस्थानकाचे दहा कोटी खर्चून सुशोभिकरण, अत्याधुनिकीकरण करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अमृत भारत योजनेंतर्गत येथील रेल्वेस्थानकाचे दहा कोटी खर्चून सुशोभिकरण, अत्याधुनिकीकरण करण्यात येत आहे. अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी येथे दिली.

रावेर रेल्वेस्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन झाले. खासदार रक्षा खडसे प्रमुख पाहुण्या होत्या. (Jalgaon MP Raksha Khadse statement 10 crore development works in Raver railway station)

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, रावेर मतदार संघाअंतर्गत यापूर्वी मलकापूर रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले होते. दुसऱ्या टप्पात रावेर, सावदा व नांदुरा या तीन रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण व विस्तारीकरण सुरु आहे. रावेर रेल्वेस्थानकासाठी सुमारे दहा कोटी रुपये निधी मिळाला आहे.

रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात विकासकामे सुरु आहे. खासदार खडसेंसह उपस्थितीतांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण झाले. (latest marathi news)

रेल्वेचे नोडल अधिकारी सुरेशकुमार गुप्ता, भाजप उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, उद्योजक श्रीराम पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भागवत पाटील, रामदास पाटील.

आर. आर. पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, दारा मोहंमद, भाजप तालुका अध्यक्ष महेश चौधरी, किशोर गनवाणी, पीपल्स बँक संचालक सोपान पाटील आदी उपस्थित होते. गजाला तबस्सुम व दीपक नगरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT