50% seats reserved for women
50% seats reserved for women sakal
जळगाव

जळगाव : सावद्यात ५० टक्के जागा महिला राखीव

सकाळ वृत्तसेवा

सावदा : पालिकेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण प्रभाग १० आणि द्वीसदस्यीय पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागात ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन जागा मिळून २० जागांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात ५० टक्के धोरणानुसार २० पैकी निम्मे १० जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर इतर अनुसूचित जातीसाठी १ महिला राखीव आणि एक जागा ही महिला आणि पुरुषासाठी तर एक जागा अनुसूचित जाती जमाती महिला व पुरुषांसाठी राखीव आणि उर्वरीत ८ जागा या सर्वसाधारण गटासाठी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतर मागासवर्गासाठी कोणतेही आरक्षण नसल्याने या निवडणुका या ठरल्याप्रमाणे ओबीसी राखीव जागांशिवाय होणार आहेत.

पालिका कार्यालयात सोमवारी सकाळी अकराला प्रांताधिकारी तथा प्रशासक कैलास कडलग तर मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली. प्रभाग क्रमांक पाच ‘अ’ या जागेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव निघाली. या वेळी प्रशासन अधिकारी सचिन चोळके, वरिष्ठ लिपिक सतीश पाटील आदी उपस्थित होते.

चुरशीच्या होणार लढती?

वीसपैकी आधीच १० जागा या महिलांसाठी राखीव असल्याने त्या जागी पुरुष निवडणूक लढवू शकत नाहीत. तर उर्वरित १० जागा या सर्वसाधारण गटासाठी आहेत. अर्थात या जागांवर पुरुष आणि महिला सुद्धा निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे सर्वसाधारण जागांमध्ये निवडणूक लढविणाऱ्यांची भाऊगर्दी अधिक होईल आणि त्यामुळे या जागांवर अधिक चुरस निर्माण होईल, हे मात्र नक्की यात शंकाच नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi on Thackeray: 'नकली संतान' उद्धव ठाकरेंवरून मोदींचा यूटर्न, नेमकं काय म्हणाले होते? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : शरद पवारांची वडगावशेरी भागातील सभा रद्द

Share Market Closing: शेअर बाजाराने घेतला सुटकेचा निश्वास; 5 दिवसांनंतर निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?

सोलापुरात आज शून्य सावली दिवस; वर्षात दोनवेळाच अशी स्थिती; खगोलप्रेमींना निरीक्षणाची संधी

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

SCROLL FOR NEXT