Maharashtra Police esakal
जळगाव

Jalgaon : सरकारचे जावाई’ पोसण्याचा अड्डा बनले ‘पोलिस मुख्यालय’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पोलिस मुख्यालयात सहा-सातशे पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे. मात्र, बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी इमाने इतबारे खाकीची रखवालदारी करत असून उर्वरित महिला कर्मचारी असोत की, पुरुष कर्मचारी सरकारचा फुकटचा पगार लाटत असल्याचे हजेरी मास्तर तक्रारी प्रकरणावरून समोर आले आहे.

कुठलही काम न करता पगार देणारी सरकारी नोकरी म्हणजे महापालिका असा जळगावकरांचा समज होता. आता मात्र, त्यात बल करुन राखीव पोलिसांचा फौजफाटा सांभाळणारे पोलिस मुख्यालयाची देखील नगरपालिका झाल्याची गत आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या साईड ब्रान्चेस, आर्थिक गुन्हे शाखा, एटीएस, एसआयडी, सीआयडी, सायबर क्राईम, लेखा विभाग, विशेष शाखा आणि जिल्ह्यातील सर्व ३४ पोलिस ठाण्यात बाराही महिने मनुष्यबळ कमतरता आहे. (Jalgaon Municipal Corporation Police become lazy trying to avoit duties jalgaon news)

मंजूर अन्‌ उपलब्ध संख्याबळात तफावत

मंजूर संख्याबळ आणि उपलब्ध स्टाफ यांच्यात नेहमीच तफावत असते. बदल्यांच्या वेळेस ठराविक पोलिस ठाणे वगळता कर्मचारीच उपलब्ध नसतात. कारण, कामचुकार पोलिसांनी आपला अड्डा पोलिस मुख्यालय करुन टाकला आहे. मुख्यालयातील हजेरी मास्टरला महिन्याला २ ते १० हजारांपर्यंत ‘खुशाली’ द्यायची अन्‌ काम न करता पोलिस खात्याच्या सर्व सुख-सुविधा आणि लाखाच्या घरातील गलेगठ्ठ पगार लुटायचा कित्ता कामचुकार पोलिस गिरवत आहे.

युटी करुन २, न करता १० हजार?

हजेरी मास्तरला महिन्याला प्रत्येकच कर्मचाऱ्याला महिन्याकाठी २ हजार द्यावेच लागते. नाहीतर तो, खोड मोडण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी ड्यूटी लावतो. परिणामी रुटीन बिघडू नये म्हणून २ ते ५ हजार महिन्याला देऊन वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी त्याच त्या कर्मचाऱ्यांना आरामाच्या ड्युट्या भेटतात. त्यात आमदार खासदारांचे गार्ड, व्हीआयपी बंदोबस्त, एस्कॉर्ट, कैदी पार्टीचा समावेश होतो. ५ ते १० हजारांची फी देणारे कुठलेच काम करत नाहीत. मात्र, त्यांची हजेरी, परेड अपटुडेट ठेवण्याचे काम हा हजेरीमास्तर करत असतो.

पोलिसांचे ‘साईड बिझनेस’

वाळू ठेकेदार, वाळू वाहतूकदार, बिल्डर, प्रॉपर्टी डीलर, हॉटेल व्यावसायिक, आधुनिक शेतकरी (फळ बागायतदार), अशा विविध उद्योगधंद्यांत कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी केवळ नावाला पोलिस खात्यात आहेत. मंत्री-आमदारांचे खास माणसं हादेखील स्वतंत्र उद्योग आहे. मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून कर्मचारी बदल्या असोत की, अधिकाऱ्यांच्या बदल्या.. इकडून तिकडे करण्यात लाखोंचा व्यवहार दडलेला असतो. यांचा पोलिस असल्याचा समजाला त्यांचा काहीच उपयोग नसला तरी, पोलिस म्हणून ते स्वतःच्या उद्योगासाठी परिपूर्ण उपयेाग करवून घेत असतात.

लपण्याचा अड्डा..

मुख्यालयात आजमितीस सहा-सातशे कर्मचारी राखीव फोर्समध्ये आहेत. त्यात परिक्षण पूर्ण करुन आलेले रिक्रुट, कार्यालयीन स्टाफ, हजेरी मास्टर, कोर्ट पैरवी, कैदी पार्टी, टपाल, दंगा नियंत्रण, राखीव पोलिसबल, आरएसआय, आरपीआय अधिकारी आणि बोटावर मोजण्याइतक्याच ठिकाणी नियमित कामे करणारे पोलिस आहेत.

मुख्यालयातील ड्युट्यांमध्ये अंगरक्षक, क्वार्टर गार्ड, जिल्‍हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय गार्ड नियुक्ती, ईव्हीएम गार्ड, पी.पी. निकम यांचे वॉचर्स-एस्कॉर्ट (ॲड. निकम मोजकेच दिवस जळगावात असताना, त्यांची गार्ड तशीच कायम असते) तर विमानतळ, दीपननगर, भुसावळ ट्रेझरी, पांडवाडा या चार ठिकाणी तब्बल ३० कर्मचारी लपवलेले आहेत.

गरजेपेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त

जिल्ह्यातील ३५ पोलिस ठाण्यात कामासाठी कर्मचारी कमी पडतात. तपासाधिकारी नसतात तर, नेहमीच उपलब्ध मनुष्यबळ कमी असल्याने काम करणाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतो. मुख्यालयात मात्र ज्या ठिकाणी ४ कर्मचाऱ्यांचे काम असते तेथे १२ लोक नियुक्त केले जातात. जास्तीचे सगळेच ‘जावई’ कॅटेगरीवाले आहेत. त्यात कागदावर नियुक्तीवाले कुणी पाणी सोडण्यासाठी, कुणी एसपी कार्यालय गेटवर, कुणी कर्मचारी वसाहतीत रात्र गस्त, दिवसा गस्तीवर असतो.

लोकप्रनिधी गार्ड असे (बारमाही तेच कर्मचारी)

विभागनिहाय डीवायएसपींचे सुरक्षारक्षक :३६

मंत्री गुलाबराव पाटील : ७

मंत्री गिरीश महाजन : ८ (एस्कॉर्टसह)

आ. एकनाथराव खडसे : ४

चंद्रकांत पाटील : ७

किशोर पाटील : ८

चिमणराव पाटील : १२ (वाय सुरक्षा)

आ. लता सोनवणे : ८ अधिक ४ (वाय सुरक्षा)

मंत्री अब्दुल सत्तार एस्कॉर्ट : ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT