Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : वाढत्या तापमानामुळे घरपट्टी भरा सकाळी, सायंकाळी; महापालिकेतर्फे नागरिकांसाठी सुविधा

Jalgaon Municipality : जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा तडाखा जाणवत आहे. त्यातच हवामान खात्याने उष्णतेची लाट येण्याचाही इशारा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा तडाखा जाणवत आहे. त्यातच हवामान खात्याने उष्णतेची लाट येण्याचाही इशारा दिला आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेने घरपट्टी भरण्यासाठी सकाळी आठ व सायंकाळी सात ही सुविधा दिली आहे. महापालिकेतर्फे घरपट्टीची बिले नागरिकांना अदा केली आहेत. ३१ मेपर्यंत घरपट्टी अदा करणाऱ्या नागरिकांना दहा टक्के सूट देण्यात येत आहे. ( provided facility between 8am and 7 pm to fill property tax )

महिलेच्या नावावर घर असल्यास पाच टक्के अधिक सूट देण्यात येत आहे. महापालिकेच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जळगाव शहरात वाढत्या तापमानामुळे घटपट्टी भरण्यावर परिणाम होत आहे. उन्हामुळे नागरिक दुपारी घरपट्टी भरण्यासाठी येऊ शकत नाही. तर सकाळी दहाला भरणा सुरू होतो. सायंकाळी पाचला बंद होतो. (latest marathi news)

यामुळे नागरिक भरणा करू शकत नाही. नागरिकांची हीच समस्या लक्षात घेऊन महापालिकेने ऊन कमी असलेल्या वेळेत नागरिकांना भरणा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी वेळेत बदल केला आहे. सकाळी आठपासून घरपट्टी भरणा सुरू होईल. दुपारी एकपर्यंत सुरू राहील.

दुपारी चारला भरणा सुरू होईल. तो सायंकाळी सातपर्यंत सुरू राहील. चारही प्रभागांत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नागकिरांनी या सुविधेचा लाभ घेऊन महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सूटचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT