Faulty hand pump. esakal
जळगाव

Jalgaon News : पारोळ्यातील हातपंप दुरुस्तीकडे नगरपरिषदेची पाठ

Jalgaon : शहरातील नगरपालिका हद्दीत ३० ते ३५ हातपंप आहेत. त्या हातपंपांना चांगल्या प्रकारे पाणीही आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील नगरपालिका हद्दीत ३० ते ३५ हातपंप आहेत. त्या हातपंपांना चांगल्या प्रकारे पाणीही आहे. यापूर्वीच्या टंचाईच्या काळात याच हातपंपानी शहरातील पाणीटंचाईवर मात केली. मात्र गेल्या अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असलेले पंप दुरुस्तीबाबत पालिकेकडून काहीही पावलं उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिकांचे हाल सुरु आहे. ()

पालिकेकडून १५ -१६ दिवसात नागरिकांना पिण्याचे मिळते. काही भागातील गोरगरीब नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भटकंती करीत आहेत. एवढे दिवस पाण्याची साठवण करण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक किती प्रमाणात पाण्याची साठवण करू शकतील असा देखील मोठा प्रश्न पडतो. अशा स्थितीत हातपंप चांगला पर्याय असूनही पालिका प्रशासनाला त्यात रस नाही.

अशी खंत माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. शहरातील पंपाद्वारे घरगुती वापरासाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध होऊ शकते. मात्र गेल्या पाच सहा वर्षापासून नगरपरिषदेने हॅन्ड पंप दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केल्याने उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत नागरिकांची गैरसोय वाढत आहे. हातपंपाबाबत नियोजनाचा अभाव होत असल्याने योग्य वेळी पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे.

कमी खर्चात दुरुस्त होणारी व स्वतःच्या हाताने पाणी उपलब्ध करून देणारे हातपंप दुरुस्तीवर लक्ष देण्याची गरज आहे. नगरपरिषदेवर गेल्या दोन अडीच वर्षापासून प्रशासक आहे. त्यांच्याकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत. मात्र ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्यामुळे तक्रार कुणाकडे करावी. असा प्रश्न आहे.

शहरातील अनेक विहिरींमध्ये आज देखील पाणीसाठा आहे. मात्र त्याच कचरा व गाळ असल्यामुळे महिला वर्ग त्याकडे फिरकत नाही. तसेच शहरातील अनेक पंपात पाणीसाठा मुबलक आहे. मात्र ते दुरुस्त होत नसल्यामुळे ते जीर्ण होत आहेत. मात्र त्यांची देखभाल दुरुस्ती केली तर शहरातील अनेक भागात असलेले हात पंप वापरात आले तर घरगुती वापरासह जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल, अशी मागणी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

''पालिकेकडून हातपंप दुरुस्ती व विहिरीतील गाळ काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना सुरू आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.''- किशोर चव्हाण, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद, पारोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT