Drinking water facility provided by the Municipal Corporation for the citizens at the square near Prakash Medical. esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : मनपातर्फे रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची सुविधा; जिल्हा दूध संघ भरणार शुद्ध थंड पाणी

Jalgaon Municipality : शहरात वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शरीरातील पाणी कमी होत असल्याने पाणी पिणे आवश्‍यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : शहरात वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शरीरातील पाणी कमी होत असल्याने पाणी पिणे आवश्‍यक आहे. यासाठी महापालिकेने नागरिकांना रस्त्यावर पिण्याच्या थंड पाण्याची १४ ठिकाणी सोय केली आहे. जळगाव जिल्हा दूध संघ यात सहकार्य करणार असून, शहरात जेवढ्या पाणपोई आहेत. त्या ठिकाणी शुद्ध थंड पाणी भरून देण्यात येणार आहे. जळगाव शहराचे तापमान सध्या कमी असले, तरी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. (Jalgaon Municipal drinking water facility on streets)

त्यामुळे शरीरातील पाणी कमी होत आहे. अशा स्थितीत पाणी पिणे गरजेचे आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना तातडीने पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शहरात पाणपोईची सुविधा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महापालिकेला दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच जळगाव महापालिकेने शहरातील १४ ठिकाणी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे.

१४ ठिकाणी सावलीत पाण्याचे रांजण (माठ) ठेवले आहेत. त्याला लाल कापड गुंडाळाले आहे, तसेच पाणी पिण्यासाठी ग्लासची व्यवस्था केली आहे. जिल्हा दूध संघातर्फे शुध्द थंड पाणी या राजंणात भरण्यात आले आहे. जिल्हा दूध संघाने शहरातील सर्व पाणपोईच्या माठात शुध्द थंड पाणी भरून देण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्यातर्फे दररोज या राजंणात थंड पाणी भरण्यात येणार आहे. (latest marathi news)

शहरातील चौदा ठिकाणे

महापालिकेने महर्षी दधिची चौक, प्रकाश मेडिकल चौक, श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, नेरीनाका स्मशानभूमी, पांझरा पोळ बस स्टॉपजवळ, अजिंठा चौफुली हॉटेल महेंद्राजवळ, स्वातंत्र्य चौक, पोलिस मुख्यालय कंपाउंड वॉलजवळ, रिमांड होमजवळ सुविधा केली आहे.

प्रथमच सुविधा

शहरातील वाढते तापमान लक्षात घेऊन नागरिकांसाठी शासनातर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रथमच करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच महापालिकेतर्फे हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT