Jalgaon municipal coproration esakal
जळगाव

जळगाव महापालिका परिसर ‘भंगार मुक्त’; बॅनरचे ग्रहण अखेर सुटले

महापालिकेने या टपऱ्या तसेच बॅनरचा भंगारात लिलाव केला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका इमारतीच्या मागील भागात अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केलेल्या टपऱ्या, बॅनर्स ठेवण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणाला ‘भंगार बाजाराचे’ रूप आले होते. महापालिकेने या टपऱ्या तसेच बॅनरचा भंगारात लिलाव केला. त्यामुळे हे सर्व त्या ठिकाणाहून हलविण्यात येत असून महापालिका परिसर आता ‘भंगार मुक्त’ होणार आहे. (Latest Marathi News)

महापालिकेची सतरा मजली इमारत ही शहराची शान समजली जाते. परंतु महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने याच सतरा मजली इमारतीच्या मागील भागात अतिक्रमणात जप्त केलेल्या टपऱ्या, बॅनर ठेवले होते. त्यामुळे या ठिकाणचा परिसर अत्यंत अस्वच्छ दिसत होता. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचल्यामुळे मच्छरांचा मोठा प्रार्दुभाव झाला होता. त्यामुळे त्याचा परिसराला धोका निर्माण झाला होता. हे भंगार तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते.

अखेर भंगाराच्या निविदा

प्रशासनाने नागरिकाच्या आरोग्याची दखल घेऊन जप्त करण्यात आलेल्या टपऱ्या व बॅनर भंगारात विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याच्या निविदा मागविल्या. त्यामधून एका निविदेला मंजुरी देवून हे सर्व भंगारात काढण्यात आले. मक्तेदाराने याच सतरा मजलीच्या आवारात गॅस कटरच्या साह्याने टपऱ्या तोडून सर्व भंगार एकत्र केले आहे. आता हे सर्व भंगार हटविण्यात येत आहे.

भंगार मुक्त पण...

जप्त केलेल्या अतिक्रमित टपऱ्या व बॅनर्सचे भंगार आता हटविण्यात येत आहे. त्यामुळे आता परिसर स्वच्छ दिसणार आहे. शिवाय सतरा मजली इमारतीची शान ही कायम राहणार आहे. परंतु आता पुन्हा अतिक्रमण विभागाने या परिसरात जप्त केलेल्या टपऱ्या व बॅनर्स टाकू नये. याबाबत अधिकाऱ्यांनी त्यांना कडक सूचना द्याव्यात, अशी मागणीही जनतेकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT