Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : मुंबई, पुण्यातून नागरिकांनी भरली जळगाव मनपाची घरपट्टी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव महापालिका आता ऑनलाइन झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना घरपट्टीचा भरणा थेट आपल्या घरात बसून भरता येत आहेत. तब्बल दहा हजार नागरिकांनी त्यांचा लाभ घेतला आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महापालिका घरपट्टी विभागातर्फे करण्यात आले आहे.

महापालिकेतर्फे शहरात घरपट्टीची बिले अदा करण्यात आली आहेत. घरपट्टी भरणा करण्यासाठी नागरिकांना महापालिका, तसेच प्रभाग समितीच्या कार्यालयात जावे लागत होते. अनेक वेळा भरणा करण्यास जाण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे ऑनलाइन घरपट्टी भरणा करण्याची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिकेने आता ही सुविधा केली आहे.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

नागरिकांना घरी बसूनच आपल्या घरपट्टीचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्याचा लाभ जळगावातील नागरिकांनी घेतला आहे. या वर्षभरात तब्बल दहा हजार नागरिकांनी महापालिकेच्या घरपट्टीचा ऑनलाइन भरणा केला आहे. मुंबई, पुणे येथूनही नागरिकांनी भरणा केला आहे.

याबाबत घरपट्टी वसुली विभागाचे अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी सांगितले, की ‘जळगाव जेएमसी डॉट ओआरजी’ या वेबसाइटवरून हा भरणा करण्यात येत आहे. या वेबसाइटवर गेल्यास नागरिकांना डेबिट, क्रेडिट कार्ड, पे-फोन, यूपीआय अशी ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा मोबाईलवरून उपलब्ध आहे. नागरिकांनी ऑनलाइन भरणा करावा, असे आवाहनही श्री. चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT