garba dress shopping esakal
जळगाव

Jalgaon Navratri 2024 : गरबा-दांडियासाठी नवरंगी पोषाखाला पसंती! नवरात्रोत्सवासाठी भाविक सज्ज; तरुणाईची उत्सुकता शिगेला

Latest Jalgaon News : नवरात्रीचे उपवास, पूजा यासह गरबा- दांडियासाठी नवरंगी पोषाखाला तरूणाईची पसंती असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Navratri 2024 : देशभरात येत्या गुरूवारपासून (ता.३) आदिमायेचा जागर नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्याची सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. युवक- युवतीमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साह संचारला आहे. नवरात्रीचे उपवास, पूजा यासह गरबा- दांडियासाठी नवरंगी पोषाखाला तरूणाईची पसंती असल्याचे दिसून येत आहे. (Dandiya Devotees ready for Navratri festival 2024)

नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्रौत्सव म्हटला जातो. नवरात्रोत्सवात भक्ती भावनेने आणि पूर्ण श्रद्धेने भक्तगण उपवार करतात. नवरात्रीत नऊ दिवसांचे नऊ रंग घालायची क्रेझ आहे. त्यामुळे बहुतांश तरुणाई त्या-त्या रंगाचे कपडे परिधान करीत असल्याचे सर्वत्र दिसत आहे.

या दिवसात युवक, युवती अगदी उत्साहाने गरबा - दांडिया खेळतात. या नऊ दिवसांत अगदी धम्माल मस्ती केली जाते. उत्सवाच्या निमित्ताने मित्रमंडळीसुद्दा एकत्र येत असल्यामुळे सर्वांच्या गाठीभेटीही होतात. मनामध्ये योजलेले उद्दिष्ट प्राप्त व्हावेत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे शारीरिक व मानसिक ताणतणाव दूर व्हावेत व आरोग्य सुलभ राहावेत.

यासाठी काहीजण नऊ दिवस उपवास करतात. एवढेच नाही तर काही जण या दिवसात चप्पलसुद्धा घालण्याचे टाळतात. वेशभूषा करून देवीसमोर दांडिया रास खेळल्या जाते. नवरात्री या सणाची अनेकजण आतुरतेने वाट पाहतात. (latest marathi news)

भाडेतत्त्वावर ड्रेस

नवरात्रोत्सवात आकर्षक वेशभूषेत दांडिया खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण, दररोज नवा ड्रेस खरेदी करणे खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे भाड्याने ड्रेस घेणे हा पर्याय आहे. येथील बाजारपेठेत युवक, युवतींचे दांडिया, गरबा खेळण्याचे ड्रेस मिळतात.

लहान मुलांच्या कपड्यांचे भाडे प्रतिदिन १५० ते ५०० रुपये तर मोठ्यांचे ३०० ते १००० रुपयांपर्यंत भाड्याने मिळतात. कपल ड्रेसिंगचे भाडे १२०० ते १५०० रुपयांपर्यंत आहे. परत आलेला ड्रेस ड्रायक्लीन करुनच इतरांना दिला जातो. प्रत्येक ड्रेससोबत त्याला शोभणारे दागिनेही उपलब्ध असून या काळात त्याला मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT