Mandal workers during immersion of Durga Devi idol in Mehrun lake on Sunday evening. esakal
जळगाव

Jalgaon Navratri 2024: आदिशक्ती दुर्गादेवी मातेला भावूपर्ण निरोप! जळगावात दांडिया, गरबा नृत्य करीत निघाल्या विसर्जन मिरवणुका

Latest Navratri 2024 News : युवकांसोबतच ठिकठिकाणी महिला, युवणींनी आकर्षक गरबा खेळून मिरवणुकीची रंगत वाढवली. सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणाऱ्या उत्सवाचा शेवटही गोड व्हावा, यासाठी तगडा बंदोबस्त होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Navratri 2024 : गेल्या दहा दिवसांपासून मनोभावे उपासना करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी आज रविवारी (ता.१३) जंगी मिरवणुकीतून आदिशक्ती दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप दिला. युवकांसोबतच ठिकठिकाणी महिला, युवणींनी आकर्षक गरबा खेळून मिरवणुकीची रंगत वाढवली. सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणाऱ्या उत्सवाचा शेवटही गोड व्हावा, यासाठी तगडा बंदोबस्त होता. (goddess durga immersion processions started with Dandiya Garba dance)

यंदाच्या नवरात्रोत्सवात शहरात अभूतपूर्व उत्साह अनुभवास मिळाला. पावसाचे दोन दिवस सोडले तर आठही दिवस दांडिया, गरबा नृत्यांनी शहरासह उपनगरात भाविकांची मोठी गर्दी होती. आदिशक्तीची स्थापना झाल्यापासून प्रत्येक सार्वजनिक मंडळाने सांस्कृतिक, धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम देखाव्यांवर भर दिला.

या उत्सवाचा शेवटही अतिशय उत्साहात करण्यासाठी मंडळांनी नियोजन केले होते. आज रविवारी दुपारी बारापासून ठिकठिकाणी मिरवणुकीस सुरुवात झाली. मंडळांनी स्वतंत्रपणे वाजत-गाजत मेहरूण तलाव, गिरणा नदी गाठून तेथे मूर्तीचे विसर्जन केले. गुलाल, फुलांची उधळण झालेल्या सार्वजनिक मिरवणुकीस दुपारी बाराला अनेक ठिकाणांवरून स्वतंत्रपणे दुर्गोत्सव मंडळांनी मिरवणूका काढल्या.

जयघोष अन्‌ गुलालाची उधळण

‘दुर्गादेवी माता की जय, अंबा माता की जय, भवानी माता की जय’चा जयघोष या मिरवणुकीदरम्यान होता. जयघोष होताच गुलालाची, फुलांच्या पाकळ्याची उधळण होत होती. अनेक मंदिरांत नवमीनिमित्त काल होम हवन, धार्मीक विधी, कुमारिका पुजन असे कार्यक्रम झालेत. (latest marathi news)

नवमी व दशमी एकत्र असल्याने सकाळी सुरवात झालेले नवमीचे कार्यक्रम दुपारी बाराच्या आत आटोपून घेतले. घटस्थापना केलेल्यांनी घट हलवून देवीची आरती केली. नंतर दशमीची तयारी करून सीमोलंघनासाठी गेले होते.

पोलिस बंदोबस्त

मेहरूण तलावावर दुर्गादेवी विसर्जन मिरवुणकीची गर्दी पाहता पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गृहरक्षक दलाचे जवानही (होमगार्ड) मदतीला घेण्यात आले होते. दुर्गादेवी मंडळाच्या सभोवती पोलिस होते.

याशिवाय मेहरूण तलावावर निर्माल्य केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यात निर्माल्य जमा करण्याचे आवाहन करण्यात येत होते. देवी विसर्जनला केवळ पाच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी होती. इतरांना लांबूनच विसर्जन पाहण्यास सांगण्यात येत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT