Prof. Manoj Patil, while joining Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde in the program at Buldana, neighboring Guardian Minister Gulabrao Patil,
Prof. Manoj Patil, while joining Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde in the program at Buldana, neighboring Guardian Minister Gulabrao Patil, esakal
जळगाव

Jalgaon News : राष्ट्रवादी‘चे प्रा.मनोज पाटील समर्थकांसह शिंदे गटात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक बबलू चौधरी यांनी सुमारे पाचशे कार्यकर्त्यांसह बुलढाणा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का दिला आहे. (Jalgaon NCP Prof Manoj Patil with supporters in shiv sena Shinde group)

पालकमंत्री गुलाबराव पाटील,खासदार प्रतापराव जाधव, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा.मनोज पाटील,बबलू चौधरी यांचेसह पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेचा ध्वज देवून स्वागत केले.

प्रा.मनोज पाटील यांची युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी (पारोळा,एरंडोल,चोपडा,अमळनेर कार्यक्षेत्र) नियुक्ती केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. शहरासह ग्रामीण भागातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांनी यासाठी प्रयत्न केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तालुकाध्यक्ष असताना त्यांनी शहरासह ग्रामीण भागात पक्षाचे संघटन मजबूत केले होते. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष यासह विविध संस्थांवर कामाचा अनुभव असल्याने अजित पवार गटातर्फे विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. (latest marathi news)

प्रा.मनोज पाटील माजी उपनगराध्यक्ष असून त्यांच्या आई देखील माजी नगरसेविका होत्या.पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा केवळ चारशे मतांनी पराभव झाला होता. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वात जास्त नऊ नगरसेवक विजयी झाले.

आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रा.मनोज पाटील यांनी सांगितले.

दरम्यान प्रा.मनोज पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शहरातील त्यांच्या शेकडो समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. प्रा.मनोज पाटील यांचेसह माजी नगरसेवक बबलू चौधरी,उबाठा शिवसेनेचे शहर चिटणीस अतुल मराठे,भानुदास आरखे,बाळा पहेलवान,अमोल तांबोळी,पंकज पाटील,आरिफ मिस्तरी,शाम जाधव यांचेसह पाचशे युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT