New BJ In the market area, the road is blocked with banners and board material beside the streets. Anda Bhurji and a shop attached to the garage. esakal
जळगाव

Jalgaon Encroachment : नव्या बी. जे. मार्केटमधील दुकानांमध्ये जाण्यास रस्ताच नाही; गाळ्यांना अतिक्रमणाचा विळखा

Jalgaon Encroachment : दरवर्षी नियमितपणे मालमत्ता कर अदा करूनही या करदात्या दुकानांपर्यंत जाण्यासाठीचे रस्ते अतिक्रमणधारकांनी अक्षरश: अडवून ठेवले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Encroachment : नवीन बी. जे. मार्केटमध्ये लाखो रुपये भरून गाळे खरेदी करत, दरवर्षी नियमितपणे मालमत्ता कर अदा करूनही या करदात्या दुकानांपर्यंत जाण्यासाठीचे रस्ते अतिक्रमणधारकांनी अक्षरश: अडवून ठेवले आहेत. या गाळ्यांपर्यंत जाण्यासाठी वाटच उरलेली नाही. मार्केटच्या वाहनतळासह दुकानांपर्यंत जाण्यासाठीच्या गॅलरीवरही अतिक्रमण वाढले आहे. गॅरेज, स्पेअर पार्ट्‌ससह विविध हॉकर्सने या मार्केटला अतिक्रमणाचा अड्डा बनवून ठेवलेय. (New BJ market no road to go to shop due to encroachment )

नवीन बी. जे. मार्केटमधील या स्थितीबाबत महापालिकेकडे काही गाळेधारकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन निद्रिस्त असून, अतिक्रमणधारकांच्या मुजोरीपुढे बिचारे गाळेधारकही हतबल झाले आहेत.

बी. जे. मार्केटची व्यथा

जिल्हा सामान्य रुग्णालय व पुष्पलता बेंडाळे चौक परिसरात मध्यवर्ती भागात जुन्या बी. जे. मार्केटला समांतर नवीन बी. जे. मार्केट उभारले आहे. छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांसह तिसऱ्या मजल्यावर काही रहिवासी गाळ्यांची रचना यात आहे. दुसऱ्या मजल्यापर्यंत दुचाकी जाऊ शकेल, अशी व्यवस्था असणारे हे जळगावातील एकमेव मार्केट. मात्र, निर्मितीपासूनच या मार्केटच्या नशिबी दुरवस्था आलीय.

तळ मजला नेहमीच पाण्यात

सुरवातीपासूनच या व्यापारी संकुलातील तळ मजल्यावर पाण्याचे डबके साचण्याची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. थोडाही पाऊस आला, की या संकुलातील तळ मजला अक्षरश: पाण्याखाली जातो. जोरात पाऊस झाला, की दुकानांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे तळ मजल्यावरील गाळेधारक या समस्येने कायमचे त्रस्त आहेत. (latest marathi news)

ग्राउंड फ्लोअरला वेढा

चौकोनी आकाराच्या भव्य संकुलास चारही बाजूंनी गाळ्यांच्या गॅलरीसमोर जवळपास ३० फुटांची जागा वाहनतळासाठी मोकळी सोडली आहे. मात्र, जिथे जागा दिसेल तेथे आपला ‘डेरा’ टाकायचा या उद्देशाने या चारही बाजूंकडील वाहनतळांना अतिक्रमणाने वेढले आहे. अतिक्रमणाच्या या समस्याने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील गाळेधारकांपेक्षा ग्राउंड फ्लोअरवरील गाळेधारकच अधिक प्रभावित झाले आहेत.

दुकानांपर्यंत जायचे कसे?

या मार्केटमधील अतिक्रमण इतके भीषण आहे की, अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व नियमितपणे मालमत्ता कर भरणाऱ्या गाळेधारकांच्या दुकानांपर्यंत जाण्यासही रस्ता शिल्लक राहिलेला नाही. कशीबशी दोन पायांची वाट काढावी लागते, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे लाखो रुपये गुंतवणूक करुन, कोट्यवधींचा व्यवसाय घेऊन बसलेले गाळेधारक यामुळे त्रस्त असून त्यांना वाहनतळावर त्यांची चारचाकी, दुचाकी वाहने लावायलाही जागा उरलेली नाही.

गॅरेजचे मार्केट

या मार्केटच्या चारही बाजूंकडील वाहनतळांवर अतिक्रमणधारकांनी छोटेमोठे गॅरेजेस्‌ थाटले आहेत. तीन-तीन फुटांच्या अंतरावर दुचाकी दुरुस्ती करणारे अनेक व्यावसायिक याठिकाणी अनधिकृतपणे व्यवसाय करीत असून, त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांमुळेही याठिकाणी बरीच कोंडी होत असते. याशिवाय अंडा ऑम्लेट, भजी, चाटच्या गाड्याही काही ठिकाणी उभ्या असतात. अन्य व्यवसायही या वाहनतळांवर थाटले आहेत.

गाळेधारकांनी विकल्यात जागा

अतिक्रमणाच्या या भीषण समस्येत काही गाळेधारकांनी भर घातल्याचे बोलले जात आहे. ज्यांच्या दुकानांमध्ये नियमितपणे ग्राहक येत नाहीत, त्यांनी त्यांच्या गाळ्यांसमोरील जागा अशा अतिक्रमणधारकांना ठराविक रक्कम घेत एकतर विकली आहे किंवा भाड्याने दिल्याचे बोलले जात आहे. काही अतिक्रमणधारकांनी याबाबत गाळेधारकांसह मनपातील कर्मचारी, तसेच काही लोकप्रतिनिधींना हप्ता द्यावा लागतो, असे सांगितले.

मनपा प्रशासनाचे झोपेचे सोंग

नव्या बी. जे. मार्केटमधील अतिक्रमणाबाबत काही गाळेधारकांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. एका प्लायवूड व्यावसायिकाने आतापर्यंत किमान १७ वेळा पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. मात्र, मनपा प्रशासन अक्षरश: झोपेत असून, त्यांना कारवाईच करायची नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया या व्यावसायिकाने ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

इंधन गरजेनुसार वापरा, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; देशहितासाठी PM मोदींचं आवाहन

RCB vs MI Live: भुवनेश्वर कुमारचा दरारा... रोहित शर्मा, सूर्याला दोन चेंडूंत गुंडाळले; पर्पल कॅप नावावर अन् मोठा विक्रम Video

SCROLL FOR NEXT