Construction work of medical hub in progress at Chincholi.
Construction work of medical hub in progress at Chincholi. esakal
जळगाव

Jalgaon News : 5 वैद्यकिय प्रशिक्षण सुविधा एका छताखाली; जळगाव मेडीकल हबचे 25 टक्के काम पुर्ण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यासाठी गौरवास्पद चिंचोली (ता.जळगाव) येथील मेडीकल हब’चे २५ टक्के पूर्ण काम झाले आहे. राहिलेले काम वर्षभरात पूर्ण होईल. एकाच छताखाली शासकीय एम.बी.बी.एस. (ऍलोपॅथी) कॉलेज, बी.एच.एम.एस. (होमियोपॅथी) कॉलेज, आयुर्वेद कॉलेजसह डेंटल व फिजोओथेरपी मेडीकल असे पाचही शासकीय कॉलेज, नर्सिंग स्कूल, वसतीगृह चिंचोलीत तयार होणाऱ्या मेडीकल हब मधून सुरू होणार आहे. (25 percent work of Jalgaon Medical Hub is complete)

सध्या जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मोहाडी येथील महिला रुग्णालयात होमीओपॅथी महाविद्यालय, देवकर रुग्णालयात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे कामकाज चालते. पण पुढील वर्षभरात खानदेशातून डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना जळगावात एकाच छताखाली वैद्यकिय शिक्षणासह पदवी मिळणार आहे.

सर्व शासकीय वैद्यकीय कोर्सेस एकाच चिंचोली येथे मेडीकल हबमध्ये मंजूरीचा मोठा निर्णय झाला. पण दोन वर्षापासून मेडीकल हबचे काम रखडले होते. मात्र आता या कामाला गती मिळून काम २५ टक्के पुर्ण झाले आहे.

शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या संस्थेच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी केंद्राच्या सार्वजनिक उपक्रम कंपन्याकडून टेंडर मागविले. पाच टेंडरपैकी मे. एच.एस.सी.सी.एल. (नोयडा) या कंपनीने टेंडर सर्वात कमी ३.०१ टक्के ठेवले.

यामुळे या कंपनीस संस्थेस प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच मुंबईतील वैद्यकिय शिक्षण संचालनालयाचे संचालक आणि मे. एचएससीसीएल कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक विनोद कुमार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

वाढीव खर्चाची तरतूद

शासनाने २४ मार्च २०२१ घेतलेल्या निर्णयानूसार जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय व ५०० खाटांचे रुग्णालय यामध्ये वाढ करण्यात येऊन १५० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय व ६५० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार आहे.

त्यासाठी वाढीव ७११ कोटी १७ लाख ५६ हजार सूधारीत खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. मे. एचएससीसीएल कंपनच्या करारानुसार बांधकाम प्रस्तावाच्या १० टक्के प्रमाणे ७१ कोटी रुपये प्रकल्प सुरु करण्यासाठी कंपनीस देण्यात आली आहे.

१०२ कोटी रुपये निधी २० डिसेंबर २०२३ ला मे.एच.एस.सी इंडिया लिमिटेड कंपनीला वर्ग झाला आहे. कंपनीच्या प्रगती अहवालानुसार चिंचोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, वसतिगृह व इतर संलग्नित सेवा यांच्या बांधकामाची प्रगती २५ टक्के व आर्थिक प्रगती २०.७ टक्के झाल्याचे सांगण्यात आले.

असे असेल मेडीकल हब

-विद्यार्थी क्षमता-१५०

- बेडची संख्या-- ६५०

- सुधारीत खर्च - ७११ कोटी १७ लाख ५६ हजार

- स्वतंत्र नर्सिंग कोर्सेस

- मुला-मुलींचे वेगवेगळे होस्टेल

- स्वतंत्र प्रशासकीय इमारत

"मेडीकल हबच्या कामाला गती आली आहे. मार्च २०२५ पर्यंत सर्व काम पूर्ण होणे अपेक्षीत आहे. मेडीकल हब मध्ये मेडीकल क्षेत्रातील अनेक पदव्यांचे कोर्सेस शासनातर्फे एकाच ठिकाणी शिकविले जातील. जळगावकरांसाठी मोठी उपलब्धी आहे."

- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

"चिंचोलीत शासकीय महाविद्यालयाच्या मेडीकल हबच्या कामाला गती आली आहे. पाच विविध प्रकारच्या मेडीकल पदव्यांचे शिक्षण या मेडीकल हब मध्ये उपलब्ध होईल. प्रशासकीय इमारतीचे काम जूनपर्यंत पूर्ण होईल. इतर इमारतीचे कामही वेगात सूरू आहे."अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT