Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : शहरात लवकरच अतिक्रमण निमूर्लन मोहीम : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. लवकरच अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे कारवाई करण्यात येईल.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. लवकरच अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे कारवाई करण्यात येईल. तसेच अतिक्रमणधारकांना भाडेतत्वावर जागा देणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली. (Commissioner Dr. Vidya Gaikwad statement Encroachment removal campaign in jalgaon city soon )

फुले मार्केट मध्ये अतिक्रमण धारकावर कारवाईची जबाबदारी दुकानदाराची आहे. असे पत्र महापालिकेतर्फे उपायुक्तांनी दिले होते. व्यापारी असोसिएशनने पत्रावर आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्यानुषंगाने आयुक्त डॉ. गायकवाड यांनी सांगितले, फुले मार्केट सह शहरातील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. दुकानदारांवर जबाबदारी नाही. महापालिका लवकरच अतिक्रमण काढण्याची कारवाई करणार आहे.

दुकानदारांवरही कारवाई

दुकानदारांना दुकानासमोरील जागा विक्रेत्यांना भाडेतत्वावर देण्याचा आणि दुकानासमोर अतिक्रमण करण्याचा हक्क नाही. दुकानासमोरील जागा भाडेतत्वावर देणे हे सुद्धा बेकायदेशीर आहे.त्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल.

ज्या दुकानदारांनी अतिक्रमणधारकांना दुकानातून वीज दिली आहे. फुले मार्केटमधील अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी बसतात. अतिक्रमणधारक ज्या पेट्या ठेवतात. अशा सगळ्यांवर पोलिसांच्या मदतीने कायमस्वरूपी कडक कारवाई करण्यात येईल. असेही डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT