jalgaon District Collector Ayush Prasad while giving instructions in the meeting in the background of Pulse Polio Campaign. esakal
जळगाव

Jalgaon Polio Vaccination : जिल्ह्यात 3 मार्चपासून पल्स पोलिओ मोहीम

Jalgaon : जिल्हा आरोग्य विभागामार्फत राज्यात ३ ते ६ मार्च राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पल्स पोलिओ समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा आरोग्य विभागामार्फत राज्यात ३ ते ६ मार्च राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पल्स पोलिओ समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड उपस्थित होते. (Pulse Polio campaign from March 3 in jalgaon district)

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी ३ मार्चला घेण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजकीय, सामाजिक, प्रतिष्टीत व्यक्ती, सोशल मीडिया कॅम्पनर यांना सहभागी करून घेण्याबद्दल सूचना दिल्या.

पल्स पोलिओ मोहिमेत जळगाव मधील स्थानिक व इतर राज्यातून येणाऱ्या बालकांना डोस पाजण्यावर भर देण्यात यावा असे सांगितले. ही मोहीम ३ ते ६ मार्च दरम्यान जिल्हाभरात राबवली जाणार आहे.

३ मार्च रोजी ठिकठिकाणी बुधवर पोलिओ डोस मिळणार आहे. तर चार ते सहा मार्च दरम्यान आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ डोस पाजणार आहेत. या मोहिमेत शून्य ते पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या पोलिओ देण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. याबाबतचे सूक्ष्म नियोजनाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी सादर केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील व जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅरेजमध्ये काम करणारे धर्मेंद्र कसे झाले सुपरस्टार? दोन वेळच्या जेवणासाठी करावं लागत होतं ओव्हरटाईम

Satara Accident: 'टेंपोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू'; लोणंद- नीरा रस्त्यावर अपघात, एक जण गंभीर जखमी..

बॉलिवूडचा ही -मॅन हरपला! अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चाहत्यांना धक्का

Phaltan Crime: 'फलटणमध्ये दुचाकी चोरट्यास अटक'; शहर पोलिसांची कारवाई, सीसीटीव्ही फुटेजद्वारे गुन्ह्याचा छडा

Dhairyasheel Mohite Patil: विकासाचे व्हिजन ठेवून उमेदवार निवडणूक रिंगणात: धैर्यशील मोहिते पाटील; अकलूजमध्ये फोडला प्रचाराचा नारळ..

SCROLL FOR NEXT