Jalgaon Crime New 
जळगाव

Jalgaon Crime: मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी! ४ जखमी, ४५ जण ताब्यात

Sandip Kapde

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यात नमाज सुरू असताना मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी ४५ जणांना ताब्यात घेतले आहे. 

आम्ही आतापर्यंत ४५ जणांना अटक केली आहे. या हिंसाचारात ४ जण जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती शांततापूर्ण असून परिसरात नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील काल रात्री दोन गटात राडा झाला. यावेळी दंगलखोरांनी अनेक वाहने जाळली. किराडपुरा परिसरात हा राडा झाला. 

लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली आणि राम मंदिराबाहेर डझनभर वाहने जाळली. प्रचंड तोडफोड झाली. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. 

परिसरात तणाव पसरला असून, तो वाढू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन तरुणांमध्ये भांडण झाल्याने हे प्रकरण दोन गटांमध्ये पसरले. दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन हजार रुपयांच्या UPI पेमेंटवर किती अतिरिक्त शुल्क लागणार? हा नियम नेमका कुणासाठी? जाणून घ्या...

Cockroch Janta Party: दिपकेच्या घरी कोअर कमिटीची बैठक, रणनिती ठरणार

Latest Marathi News Live Update : लोकसभा ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पुन्हा भरेपर्यंत स्थगित

Lohara Politics: लोहारा राजकारणात मोठी खळबळ! अमोल बिराजदारांना भाजपची खुली ऑफर; नगराध्यक्षपदाचीही चर्चा

'आज मौनव्रत आहे!' पत्रकारांच्या प्रश्नांवर रवी किशन यांचं भन्नाट उत्तर, म्हणाले...'पंडित जी ने आज मौन...'

SCROLL FOR NEXT