Death News esakal
जळगाव

Jalgaon News : आर्थिक टंचाईने त्रस्त तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कंडारी (ता.जळगाव) येथील अरुण रामकृष्ण कोळी (३४) या तरुण शेतकऱ्याने वाघूर धरणाच्या भिंतीलगत झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. अडीच एकर शेतात कापूस लावलेला असून आर्थीक परिस्थीती जेमतेम असलेल्या या शेतकऱ्यावर नेमके कर्ज किती होते याची माहितीही कुटूंबीयांना नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कंडारी येथे अरूण रामकृष्ण कोळी हे तरुण शेतकरी पत्नी वंदना व तीन मुलींसह वास्तव्यास होते. गुरुवारी (ता. १) सकाळी अकराच्या सुमारास घरातून अरूण कोळी शेताच्या दिशेने निघून गेले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्यामुळे त्यांचे काका बापू कोळी चुलत भाऊ विनोद कोळी यांच्यासह नातेवाईक परिसरातील जंगलात शोध घेण्यास निघाले होते.

वाघूर धरणाच्या परिसरात शोध घेतल्यावर याठिकाणी धरणाच्या भिंतीला लागून एका झाडाला अरूणचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तत्काळ नशिराबाद पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. अरुण यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात विच्छेदनानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले. नशिराबाद पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

आर्थिक अडचण आणि कर्ज

अरुण कोळी यांच्याकडे अडीच एकरच शेती असून कापूस लावला आहे. अनेक दिवसांपासून ते अर्थिक अडचणीत होते, त्यात लहरी हवामानामुळे शेती उत्पन्नाचा भरवसा नाही. प्रचंड मेहनत करूनही कुटूंब पोसणंही अशक्य होत नसल्याने ते तणावात राहायचे. अरुण यांनी नेमके कोणाकडून कर्ज, हात उसनवारीवर पैसे घेतले हे अद्याप कुटूंबियांनाही सांगता येणे अशक्य आहे. अरुण कोळी यांना तीन मुली असून लहान मुलगी अवघी सहा महिन्यांचीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT