Speaking at the principal's workshop on implementing the new educational policy at UMVIT, Vice-Chancellor Prof. V. L. Maheshwari. esakal
जळगाव

Jalgaon NMU News : यंदापासून ‘उमवि’त नवे शैक्षणिक धोरण! पदवी अभ्यासक्रमास लागू; प्राचार्यांच्या कार्यशाळेत मंथन

Jalgaon News : या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणत्याही शिक्षकाचा वर्कलोड कमी होणार नाही, याची दक्षता अनुदानित महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर घ्यावी, असे आवाहन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon NMU News : कला, वाणिज्य व विज्ञान पदवी अभ्यासक्रमास येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सर्वतोपरी सहकार्य करावे. या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणत्याही शिक्षकाचा वर्कलोड कमी होणार नाही, याची दक्षता अनुदानित महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर घ्यावी, असे आवाहन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. (Jalgaon NMU new education policy from this year news)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरुवारी (ता. ९) नवीन शैक्षणिक धोरणाबात संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा झाली. तीत कुलगुरू ते बोलत होते. मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्राचार्य एस. एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील उपस्थित होते.

प्रा. माहेश्वरी म्हणाले, की नवीन शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांशी चर्चा करून, त्यांच्या सूचना लक्षात घेऊन तयार केले आहे. धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी वर्षभर विद्यापीठाकडून विविध कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्यात आली. आता इयत्ता बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असून, पदवीस्तराच्या माहितीपत्रकात चारवर्षीय पदवी अभ्यासक्रमाची माहिती देणे गरजेचे आहे. प्राचार्यांनी सर्व शिक्षकांशी या धोरणाबाबत चर्चा करावी.

प्रा. एस. टी. इंगळे यांनी धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपूर्वी सर्व शंकाचे निराकरण करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आल्याचे प्रास्ताविकात सांगितले. वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्य व आंतरविद्या शाखा यांची ‘अभ्यासक्रम रचना’ यावर तीन सत्रांत अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्राचार्य एस. एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य प्रीती अग्रवाल आणि प्राचार्य ए. बी. जैन यांनी पदवीस्तरावर हे धोरण राबविताना आलेले अनुभव सांगितले. प्रा. व्ही. एन. रोकडे यांनी सूत्रसंचालन केले.

मूल्यांकन, मूल्यमापनावर चर्चा

दुपारच्या सत्रात सहअभ्यासक्रमांचे मूल्यांकन व मूल्यमापनावर चर्चा झाली. त्यानंतरच्या सत्रात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने खुली चर्चा झाली. त्यात उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन कुलगुरू व अधिष्ठाता यांनी केले. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. (latest marathi news)

पदवी अभ्यासक्रमाची रचना अशी राहणार

कार्यशाळेत अभ्यासक्रमाच्या रचनेची पूर्ण माहिती देण्यात आली. पदवीच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला क्रेडिट गुणांकन पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाईल. म्हणजे प्रत्येक विषयाचे क्रेडिट निश्चित केले जातील. येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय असेल.

त्याला ‘ऑनर्स’ पदवी म्हटले जाईल. तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम कायम राहणार आहे. शिक्षण सुरू असताना, बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना काही अटींसह पुन्हा प्रवेश घेता येईल. मात्र, त्यासाठी सात वर्षांची मुदत निश्चित केली आहे. प्रत्येक विषयांचे रूपांतर क्रेडिट गुणांकन पद्धतीत केले जाईल.

प्रत्येक वर्षी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पहिल्यावर्षी पदवी प्रमाणपत्र (किमान ४० व कमाल ४४ क्रेडिट गरजेचे), दुसऱ्या वर्षी डिप्लोमा प्रमाणपत्र (किमान ८० व कमाल ८८ क्रेडिट गरजेचे), तिसऱ्या वर्षी पदवी प्रमाणपत्र (किमान १२० व कमाल १३२ क्रेडिट गरजेचे) दिले जाईल. चौथ्या वर्षी आठ सेमिस्टर पूर्ण केल्यावर संशोधन किंवा स्पेशलायझेशन पूर्ण झाल्यावर ऑनर्स पदवी दिली जाईल. त्यासाठी किमान १६० व कमाल १७६ क्रेडिट गरजेचे आहे.

ऑनर्स स्पेशालायझेशन चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात चौथ्या सत्रात किमान २० क्रेडिटसह इंटर्नशिप आणि मुख्य विषय अभ्यासक्रमात असतील, तसेच संशोधन पदवीसह चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमात चौथ्या वर्षांत किमान २० क्रेडिटसह संशोधन प्रकल्प, सेमिनार, प्रबंध व इंटर्नशिप असणार आहे. अभ्यासक्रमात ‘मेजर’ आणि ‘मायनर’, असे विभाग असून, ‘मायनर’मध्ये आपल्या शाखेव्यतिरिक्त इतर आपल्या आवडीचा विषय शिकता येईल. चार वर्षांची ऑनर्स पदवी प्राप्त झाल्यानंतर एका वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT