Objection to appointment of Principal in High School at Chalisgaon esakal
जळगाव

Jalgaon News : चाळीसगाव येथील हायस्कूलमधील मुख्याध्यापकांच्या नेमणुकीवर हरकत

Jalgaon News : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई बंकट मुलांच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाच्या नेमणुकीवर याच शाळेतील दोघा ज्येष्ठ शिक्षकांनी हरकती घेतल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई बंकट मुलांच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाच्या नेमणुकीवर याच शाळेतील दोघा ज्येष्ठ शिक्षकांनी हरकती घेतल्या आहेत. त्यामुळे आ. बं. हायस्कूल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई बंकट मुलांच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक के. एन. तडवी हे मे २०२४ अखेर सेवानिवृत्त झाले. (Objection to appointment of Principal in High School at Chalisgaon)

त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संस्थेने बी. बी. सोनवणे यांची १ जून पासून नेमणूक केली आहे. मात्र, सोनवणे यांची मुख्याध्यापकपदी केलेली नेमणूक नियमानुसार नसल्याने ज्येष्ठ शिक्षक व्ही. ए. शिंगाडे व बी. एस. फणसे यांचे म्हणणे असून त्यांनी संस्थेसह जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे हरकती घेतल्या आहेत.

या दोन्हींच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्रमांक ३ नुसार सेवाज्येष्ठ प्रशिक्षित व्यक्तीची पदोन्नतीने मुख्याध्यापकपदी व्यवस्थापक वर्गाने व्यवस्थापन मंडळात ठराव करून नेमणूक करावी अशी तरतूद आहे. या संस्थेने मात्र हा नियम न पाळता बी. बी. सोनवणे यांची मुख्याध्यापकपदी नेमणूक केली.

शालेय शिक्षण विभाग मुंबई यांच्या २४ मार्च २०२३ च्या राजपत्रातील निर्देशानुसार संस्थांनी सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करावी, असे स्वयंस्पष्ट निर्देश आहेत. या राजपत्रातील निर्देशानुसार सेवाज्येष्ठता याद्या अद्ययावत कराव्यात, असे शिक्षण संचालक (पुणे), शिक्षण उपसंचालक (नाशिक) यांचे सुद्धा आदेश आहेत. (latest marathi news)

तसेच सेवाज्येष्ठता याद्या अद्ययावत करण्याबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद जळगाव यांनी आदेश काढले आहेत. अद्ययावत सेवाज्येष्ठता याद्या फेब्रुवारी २०२४ व एप्रिल २०२४ च्या नियमित वेतन देयकासोबत जोडण्याबाबत सुद्धा आदेश केले आहेत. मात्र, तरीही सेवाज्येष्ठता याद्या वेतन देयकात जोडलेल्या नाहीत. त्यामुळे शासन व शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान झाला आहे.

व्ही. ए. शिंगाडे यांची मूळ नेमणूक १ जुलै १९९० ला असून ते १९९२ मध्ये प्रशिक्षित पदवीधर झाले आहेत. बी. एस. फणसे यांची मूळ नेमणूक १ ऑगस्ट १९९० असून ते ८ जुलै १९९३ ला प्रशिक्षित पदवीधर झालेले आहेत. याउलट बी. बी. सोनवणे यांची मूळ नेमणूक ही १९ जुलै १९९३ मध्ये झाली आहे.

असे असताना संस्थेने व्ही. ए. शिंगाडे व बी. एस. फणसे यांची सेवाज्येष्ठता डावलून आपल्या मर्जीतील बी. बी. सोनवणे यांची मनमानी व पक्षपातीपणे मुख्याध्यापकपदी नेमणूक केली आहे. जी बेकायदेशीर आहे. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीने शासनाच्या निर्देशाचे पालन न केल्याचे सांगत दोन्ही शिक्षकांनी घेतलेल्या या हरकतीवर शिक्षण विभागाचे अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT