water shortage in well esakal
जळगाव

Jalgaon Water Shortage: जिल्ह्याच्या पाणीपातळीत दीड ते दोन मीटर घट! भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल; कडक उन्हाळ्याचा परिणाम

Jalgaon News : जिल्ह्यात मे महिन्यात सर्वांधिक तापमान होते. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Shortage : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४७ अंश पार केले होते. मे महिना सर्वाधिक तापमानाचा गेला. याचा परिणाम भूगर्भातील पाणीपातळीवर होऊन जिल्ह्यातील अनेक भागांतील पाणीपातळीत दीड ते दोन मीटरने घट झाली आहे, असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे.

यावर पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, झाडे लावणे, सर्वांनीच पाण्याची बचत करणे, या उपाययोजना असल्याचे सांगण्यात आले. यावल, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव तालुक्यांत सर्वाधिक पाणीपातळीत घट झाली आहे. (Jalgaon One half to two meter drop in water level of district)

जिल्ह्यात मे महिन्यात सर्वांधिक तापमान होते. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही झाली. सर्व बाजारपेठा, उद्योगांवर अधिक तापमानाचे सावट होते. ‘दिवसा सामसूम अन्‌ रात्री उशिरापर्यंत गर्दी’, असे बाजारपेठेतील चित्र होते. टंचाईग्रस्त भागांत पाण्याचे टँकर, शहरात पाणी बॉटल, पाण्याचे जारला अधिक मागणी होती.

जिल्ह्यात एकूण ९४ गावांत पाणीटंचाई जाणविली. त्या गावांत ११३ टँकर सुरू करून नागरिकांची पाण्याची तहान भागविण्याचे जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले. टंचाई निवारणार्थ १६६ गावांत १८६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. अजून पावसाळा हवा तसा सुरू झालेला नाही. यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची गावे वाढण्याची चिन्हे आहेत. (latest marathi news)

भूजल सर्व्हेक्षण विभागानुसार तालुकानिहाय पाणीपातळीतील घट अशी

तालुका--मीटरने घट

यावल--२.१७

चाळीसगाव--२.१५

अमळनेर--१.९४

धरणगाव--१.९७

रावेर--०.५९

मुक्ताईनगर--०.५१

भुसावळ--०.०७

जामनेर--०.९५

बोदवड--१.९०

जळगाव--०.७३

एरंडोल--०.९८

चोपडा--०.६१

पारोळा--०.५८

पाचोरा--०.७४

भडगाव--१.४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

३० नंतर टीम इंडियात एंट्री; ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा कर्णधार... सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजय प्रवासाची प्रेरणादायी यशोगाथा

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतत होते; मात्र वाटेतच काळानं गाठलं, लग्नाआधीच लेकीचं पितृछत्र हरपलं

Akola News : ‘चिटफंड’चा वाद पेटला, प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत; ‘बीसी’चे पैसे न मिळाल्याने ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT