National Highway (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातून महामार्ग नेण्यास विरोध; अंतुर्लीच्या शेतकऱ्यांची भूमिका

Jalgaon News : तळोदा- बऱ्हाणपूर हा नियोजित राष्ट्रीय चौपदरी महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून गेल्यास आधीच जेमतेम जमीन असलेले शेतकरी भूमिहीन होतील.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तळोदा- बऱ्हाणपूर हा नियोजित राष्ट्रीय चौपदरी महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून गेल्यास आधीच जेमतेम जमीन असलेले शेतकरी भूमिहीन होतील; त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून नेण्यास आमचा कायमच विरोध राहील अशी भूमिका अंतुर्ली ( ता मुक्ताईनगर ) येथील शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातूनच जाणार असल्याचे २९ फेब्रुवारी २०२४ च्या राजपत्रात प्रसिद्ध झाले आहे. (Jalgaon Opposition to take highway from Muktainagar taluka)

तशी बातमी 'सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या शेतकऱ्यांनी प्रतिनिधीशी संपर्क साधून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत असल्याबद्दल ‘सकाळ’ला धन्यवाद दिले. अंतुर्ली येथील शेतकरी चुनीलाल सोनवणे म्हणाले, आपल्याकडे फक्त तीन एकर शेती असून जवळपास सर्वच शेत या राष्ट्रीय महामार्गात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

अंतुर्ली येथीलच अनिल दुट्टे यांचीही चार एकर शेती एवढी सगळीच शेती या नियोजित राष्ट्रीय महामार्गात जाणार आहे.

या दोघांसह आणखी असंख्य शेतकरी भूमिहीन होतील. शासनाकडून या शेतकऱ्यांना जमिनीचा मिळणार असलेला मोबदला अत्यल्प असेल.

त्यामुळे या सर्वच शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेली जमीन महामार्गात जाईल. म्हणून हा महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून जाण्यास आमचा तीव्र विरोध असल्याची भूमिका ही त्यांनी मांडली. या राष्ट्रीय महामार्गाबाबत खासदार रक्षा खडसे यांच्यावर आता त्या भागातील शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT