National Highway Bypass through Dharangaon Road.
National Highway Bypass through Dharangaon Road. esakal
जळगाव

Jalgaon News : बायपास गावाबाहेर, व्यावसायिकांना घरघर; वाहने थांबत नसल्याने खादपदार्थ, शीतपेयांची विक्री मंदावली

संजय पाटील

Jalgaon News : पारोळा शहर राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वसले आहे. शहरालगत महामार्गावर अनेक व्यवसायिकांनी उदरनिर्वाह करण्यासाठी दुकाने सुरू केली आहेत. मात्र, गावाबाहेर बायपास गेल्याने मार्गालगत ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ थांबल्याने दुपारपासूनच महामार्गावर शुकशुकाट दिसून येत आहे. (Jalgaon Parola city National Highway Bypass passes outside village sale of food items and soft drinks has slowed down)

यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह इतर प्रतिष्ठानच्या मालकांना व मजुरी करणाऱ्या कारागिरांना घरघर लागली आहे. शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मात्र, या ठिकाणी कोणतीही औद्योगिक वसाहत नसल्यामुळे येथील तरुणासह अनेक जण कापड व्यवसाय, बिगारी काम किंवा इतर वस्तू विकून पोटाची खडगी भरतात.

राष्ट्रीय महामार्ग ५३ वरूनच बायपास जाणार असल्यामुळे अनेकांनी या मार्गालगत जागा विकत घेतली. मात्र, बायपास राष्ट्रीय महामार्ग ५३ वर न टाकता तो म्हसवे फाटा ते धरणगाव रस्तावरून अमळनेर रस्ता ते सत्यनारायण मंदिरापुढील रस्त्याला जोडला. यामुळे या मार्गातून ये-जा करणारी वाहने गावात न येता बायपासलगतच जात असल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसह इतर प्रतिष्ठानांना याचा मोठा फटका बसत असून, या व्यवसायिकांना घरघर लागली आहे. (latest marathi news)

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धरणगाव फाटा ते श्री सत्यनारायण मंदिरादरम्यान तब्बल २०० ते ३०० विविध दुकाने आहेत. महामार्गालगत इतर खेड्यांची रस्ते जोडल्यामुळे थोड्या फार प्रमाणात रहदारी दिसून येते. गावातील महामार्गावर बसस्थानक असल्यामुळे बस व खासगी वाहतूक करणारे प्रवासी व तालुक्यातील शहरात येणारे नागरिकांवरच दुकानांचा व्यवसाय होत आहे.

दरम्यान, लांब पल्ल्याच्या अवजड वाहनासह इतर खासगी वाहने बायपासवरून जात असल्यामुळे गावातील महामार्गाच्या रस्त्यावरून बराच वेळा शुकशुकाट दिसून येतो. परिणामी, महामार्गावरील आजूबाजूला असलेली अनेक दुकाने ग्राहकांअभावी कमी-अधिक प्रमाणात सुरू आहेत.

"राष्ट्रीय महामार्गावर रसवंती व शीतपेयाचा व्यवसाय सुरू केला. मात्र, प्रवासी व वाहनधारक थांबत नसल्यामुळे वस्तू पडून राहतात. त्यामुळे नेहमी विवंचनेत राहावे लागते." -सुकदेव पाटील, रसवंती चालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT