Crop Insurance  esakal
जळगाव

Jalgaon Crop Insurance : कापूस, केळी पीक विम्याची रक्कम द्या

Jalgaon Crop Insurance : खरीपाच्या सुरवातीला जून- जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने व सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे कापसासह इतर पिकाचं अतोनात नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crop Insurance : जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या रक्कमा जमा कराव्यात अन्यथा २० मार्चला शेतकरी संघटना पीक विम्याच्या कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, किरण गुजर, विनोद धनगर, सचिन शिंपी, अखिलेश पाटील, चेतन पवार, सय्यद देशमुख आदींनी दिला आहे. (Jalgaon Pay amount of cotton banana crop insurance Demand of Farmers Union)

खरीपाच्या सुरवातीला जून- जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने व सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे कापसासह इतर पिकाचं अतोनात नुकसान झाले. लाखों रुपयांचे नुकसान भरून निघावे म्हणून शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली. मात्र शेतकऱ्यांना हजार रुपयांच्या मदतीसाठी विमा कंपन्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.

जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ५५ हजार ७७९ शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झाले. जिल्ह्यात ८७ महसूल मंडळांपैकी २७ महसूल मंडळात २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे "त्या" २७ मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम म्हणून पीक विम्याची रक्कम आता वाटप करण्यात आली.

मात्र उर्वरित ६० महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसामुळे कापसासह इतर पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी नोंदवून, कंपनी प्रतिनिधीनी नुकसानग्रस्त शेतावर जाऊन पंचनामे करून ५ महिने झाले तरी ही त्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत नाही.

पीक विमा भरताना एक विशिष्ट मुदतीत भरावा लागतो तसेच पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत तक्रार दाखल करावी लागते मात्र नुकसानग्रस्त शेतावर पीक पंचनामे करायला कोणतीही मुदत दिली जात नाही तसेच पीक विम्याची रक्कम देताना कोणतेही ठोस मुदत दिली जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय महिला संघाची 'ती' कृती अन् R Ashwin ने पुरुषांच्या संघाचे काढले वाभाडे; म्हणाला, ते फक्त प्रसिद्धीसाठी बाता मारतात, पण..

Pune News: पुणे जिल्ह्यात भीतीचा अंत! शिरूरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Akkalkot News: 'अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत'; एक कोटी पाच लाख निधी मंजूर; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार

Mumbai News : हाताला मेहंदी लावली म्हणून विद्यार्थीनीला वर्गातून बाहेर काढलं, पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार....

SCROLL FOR NEXT