Beating latest crime news
Beating latest crime news esakal
जळगाव

Jalgaon PI Beating Case : त्या मारहाण प्रकरणात DYSPच अनभिज्ञ

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात खंडपीठाचा जामिन प्राप्त संशयित हजेरीसाठी आला असताना पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडून मारहाण करण्यात आली. मारहाण प्रकरणात जळगावात दाखल जखमीने त्यांच्याविरुद्ध तक्रारी जबाब दिला असताना भुसावळ उपविभागाचे डिवायएसपींनी आपल्याला हे प्रकरण माहिती नसल्याचे ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.
भुसावळ बाजारपेठ पेालिसांत आर्मॲक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयित निखिल सुरेश राजपूत याला उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला होता. अटक न हेाता संशयिताला जामीन मंजूर झाल्याचा राग मनात ठेवून बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी निखिल राजपूत या तरुणाला अमानवीय पद्धतीने मारहाण करून त्याची अर्धी दाढी कैचीने कापून मरणासन्न अवस्थेत येईस्तव मारहाण केल्याची घटना घडली.(Jalgaon PI Beating Case DYSP unaware of that beating case Jalgaon Crime News)

जखमीवर जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्‍हापेठ पोलिसांनी जखमीचे जाब-जबाब नोंदवून घेतले. बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीबाबत त्याने तक्रार केली असताना हे प्रकरण आपल्याला माहितीच नाही, असे भुसावळ भागचे डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.
मला माहिती नाही..
"या प्रकरणा संदर्भात अद्याप पावेतो कुठलीही तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही. किंवा तसा गुन्हाही दाखल झालेला नाही. तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल."
सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, भुसावळ भाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On PM Modi Offer: PM मोदींच्या सोबत येण्याच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, 'PM मोदींमुळे....'

Impact Player: रोहित शर्मासह अनेकांनी टीका केलेला इम्पॅक्ट प्लेअर नियम IPL मधून होणार बाद? जय शाह म्हणाले...

PM Modi Offer Sharad Pawar: सगळी स्वप्ने पूर्ण होतील.. पंतप्रधान मोदींची शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर!

Ye Re Ye Re Paisa: "कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..!"; 'येरे येरे पैसा 3' ची घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Latest Marathi News Live Update : मुंबई शिक्षक मतदार संघावर तीन पक्षांचा दावा

SCROLL FOR NEXT