Raver Loksabha Constituency BJP  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election: रावेर लोकसभा मतदारसंघावर 3 निवडणूकांपासून भाजपची पकड कायम! 1995 नंतर कॉंग्रेसचा प्रभाव ओसरला

Lok Sabha Election : नव्याने २००८ पासून तयार झालेला रावेर लोकसभा मतदारसंघ हा मागील ३ निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो.

दिलीप वैद्य

रावेर : नव्याने २००८ पासून तयार झालेला रावेर लोकसभा मतदारसंघ हा मागील ३ निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. मात्र त्यापूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघावर काँग्रेसचा प्रभाव होता.

१९९५ नंतर काँग्रेस पक्षाची व पक्षाच्या कार्यकर्त्यांची या मतदारसंघावरील पकड कमी होत गेली आणि भारतीय जनता पक्षाला किमान ३ लाखांचे मताधिक्य मागील दोन निवडणुकीत मिळाले. (Jalgaon political Lok Sabha Election Raver Constituency marathi news)

स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाचे नाव भुसावळ लोकसभा मतदारसंघ असे होते. त्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब शिवराम राघो राणे हे निवडून आले होते. त्यानंतर देखील तत्कालिन खासदार वाय. एस. महाजन यांनीही या मतदारसंघातून विजय मिळवत काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले.

त्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे नेतृत्व जिल्ह्याला लाभले होते. तोपर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचा वरचष्मा होता मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांनी लोकसभा निवडणुकीत देखील यश संपादन करून काँग्रेसच्या मजबूत गढीचा पाया ढासळविण्यास सुरुवात केली.

भाजपचे नेते वाय. जी. महाजन यांनीही येथून प्रतिनिधित्व करून पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवली. १९९०-९५ आणि त्यानंतरच्या काळात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी संपूर्ण जिल्ह्यावरच पक्षाचा प्रभाव निर्माण केला.

२००८ मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाली. यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाला. २००९ मध्ये हरिभाऊ जावळे यांचा निसटता विजय झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र पाटील यांचा २८२१८ मतांनी पराभव झाला. मात्र या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे उमेदवार सुरेश चिंधू पाटील यांनी ३३६४१ इतकी मते घेतली. या निवडणुकीत मराठा पाटील समाजाचे मत विभाजन होऊन त्याचा लाभ जावळे यांना झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

२०१४ मध्ये जावळे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली; मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच रद्द करून ती एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना देण्यात आली. श्रीमती खडसे यांचा ३ लाख १८ हजार मतांनी विजय झाला होता. २०१९ मध्ये पुन्हा रक्षा खडसे यांनाच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि यावेळी त्यांच्या मतांमध्ये आणखी वाढ झाली.

त्यांना ६ लाख ५२ हजार २४२ इतकी मते मिळाली तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना ३ लाख ३३ हजार ४७२ इतकी मते मिळाली होती. मागील ८ लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर त्यात १९९८ मध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील विजयी झाले होते, उर्वरित ७ निवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. (latest marathi news)

मजबूत पक्षसंघटन

मागील ५ वर्षात भारतीय जनता पक्षाने रावेर लोकसभा मतदारसंघासह देशभरातच पक्ष संघटन अधिक मजबूत केले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम रक्षा खडसे यांनी केले आहे. याचबरोबर काही विकास कामे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आणखी सक्रिय व्हायला हवे होते असाही मतदारांमधील सूर आहे.

सन विजयी उमेदवार पक्ष

१९५२ शिवराम राघो राणे - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

१९५७ नैशीर कुरेसेटजी भरूचा -प्रजासत्ताक समाजवादी पार्टी

१९६२ जुलालसिंग शंकरराव पाटील -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

१९६७ एस. एस. सामदळी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

१९७१ कृष्णराव माधवराव पाटील -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

१९७७ वाय. एम. बोरोले - भारतीय लोक दल

१९८० वाय. एस. महाजन - इंदिरा काँग्रेस

१९८४ वाय. एस. महाजन - इंदिरा काँग्रेस

१९८९ वाय. एस. महाजन - इंदिरा काँग्रेस

१९९१ डॉ गुणवंतराव सरोदे - भारतीय जनता पक्ष

१९९६ डॉ गुणवंतराव सरोदे - भारतीय जनता पक्ष

१९९८ डॉ उल्हास वासुदेव पाटील - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

१९९९ वाय. जी. महाजन - भारतीय जनता पक्ष

२००४ वाय. जी. महाजन - भारतीय जनता पक्ष

२००७ हरिभाऊ माधव जावळे - भारतीय जनता पक्ष

२००९ हरिभाऊ माधव जावळे - भारतीय जनता पक्ष

२०१४ रक्षा निखिल खडसे - भारतीय जनता पक्ष

२०१९ रक्षा निखिल खडसे - भारतीय जनता पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT