Stagnant water in Prajapatnagar. esakal
जळगाव

Jalgaon: वीज पडल्याने प्रजापतनगरातील ट्रान्सफार्मरवर जळाला! 10 तास वीजपुरवठा खंडित; जळगाव शहरात जोरदार, तर जिल्ह्यात हलका पाऊस

Jalgaon News : जोरदार पाऊस अन्‌ विजांच्या कडकडाट रविवारी रात्री पाहावयास मिळाला. पावसाचे पाणी शहरातील रस्त्यावर साचले होते. सकाळपर्यंत अनेक ठिकाणचे पाणी साचलेले होते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. शहरात रात्री पावणेदहाच्या सुमारास जोरदार पाउस सुरू झाला. शहरातील प्रजापतनगरातील ट्रान्सर्फामरवर वीज पडल्याने तो जळाला. यामुळे शिवाजीनगरसह परिसरात तब्बल १० तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

जोरदार पाऊस अन्‌ विजांच्या कडकडाट रविवारी रात्री पाहावयास मिळाला. पावसाचे पाणी शहरातील रस्त्यावर साचले होते. सकाळपर्यंत अनेक ठिकाणचे पाणी साचलेले होते. (Jalgaon Prajapatnagar transformer burnt due to lightning )

पंधरा शेळ्यांचा मृत्यू

मौजे शिरसोदे (ता. पारोळा) येथील दामू लखा भिल यांच्या मालकीच्या १५ शेळ्या रविवारी रात्री झालेल्या पावसात वीज पडून मृत्यूमुखी पडल्या. पारोळा शहरात घरावर वीज पडून घर व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवानी यात जीवितहानी झाली नाही. (latest marathi news)

शेतकरी शेतात

रविवारी रात्री चांगल्या पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता. २४) सकाळी शेतकरी शेतात पेरणीसाठी आले होते. काही ठिकाणच्या सखोल भागातील शेतात पाणी साचले होते. ते पाणी काढून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्याचे दिसून आले. गेल्या २२ दिवस पावसाने ओढ दिली होती. रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी जोमाने पेरण्या करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Currency Racket Kolhapur : कोल्हापुरात बनावट नोटांचे रॅकेट, हजारोंच्या नोटांसह प्रिंटर ताब्यात; गोठ्यात करत होते कारनामा

Rishabh Pant is Back! दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाजांशी गमतीशीर संवाद, Video व्हायरल

फेक कॉल सेंटरचा मास्टरमाइंड फारुकीला गोव्यात ठोकल्या बेड्या; अलिशान सात कार केल्या जप्त, पोलिसांना टिप मिळाली अन्...

Sudhir Gadgil Letter Bomb : सांगली भाजपमध्ये उपऱ्यांचे इनकमींग, आमदार सुधीर गाडगीळांचा लेटरबॉम्ब; पालकमंत्र्यांची दिशाभूल

Gold Price Drop : दिवाळीनंतर सोन्याचे दर गडगडले! ८ दिवसांत सोन्यात ११,७००, तर चांदीत १७ हजारांची घसरण.

SCROLL FOR NEXT