Damage to banana crops due to pre-monsoon storms. Chicken shed leaves blown in a storm. esakal
जळगाव

Jalgaon Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन; पारोळा, यावल, रावेरसह अनेक ठिकाणी बरसल्या सरी

Pre-Monsoon Rain : शहरासह जिल्ह्यातील मॉन्सूनपूर्व पावसाने बुधवारी (ता. ५) सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार सलामी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Pre-Monsoon Rain : शहरासह जिल्ह्यातील मॉन्सूनपूर्व पावसाने बुधवारी (ता. ५) सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार सलामी दिली. पारोळा, चाळीसगाव, पाचोरा, यावल यासह काही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पारोळा शहरात बुधवारी (ता. ५) सकाळपासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत होती. (rains in many places including Parola Yawal and Raver )

दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. या वेळी पावसामुळे गटारी ओसंडून पाणी रस्त्यावर आल्याने जुनी पोस्ट गल्ली, लवन गल्ली, भाटेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची तारांबळ उडाली. सुमारे अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरात गारवा निर्माण झाला. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांतही पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विजेचा कडकडाट व वारा सुटत असल्याने बऱ्याचदा विजेच्या लपंडावामुळे शहरवासीयांना अंधाराचा सामना करावा लागला.

यावल येथे जोरदार पाऊस

यावल : शहर व परिसरात बुधवारी (ता. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. तालुका व परिसरात गेल्या उष्ण तापमानात वाढ झाल्याने तालुकावासीय त्रस्त झाले होते. बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

चाळीसगाव तालुक्यात हजेरी

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात आज सायंकाळी पाचला अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या झालेल्या पावसामुळे मेहुणबारे, भऊर, जामदा, बहाळसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे गुरुवारी (ता. ६) शेतीच्या कामांना वेग येणार आहे. ज्यांच्या विहिरीला पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीचेही नियोजन केले.

नगरदेवळ्यात वादळात पत्रे उडाले

नगरदेवळा (ता. पाचोरा) : परिसरात मंगळवारी रात्री मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी नगरदेवळा, नगरदेवळा सीम, शिंदोळ, पिंपळगाव खुर्द शिवारात वादळी वाऱ्याने बऱ्याच शेतकऱ्यांची केळी भुईसपाट झाली; तर कोंबडी शेडचे पत्रे उडून गेले. अगोदरच दुष्काळी परिस्थितीत जेमतेम केळी पीक वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढवले असून, या नुकसानीचा पंचनामा होऊन भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT