Blood Pressure (file photo)
Blood Pressure (file photo) esakal
जळगाव

High Blood Pressure : तरुण पिढीतही जाणवतोय रक्‍तदाबाचा त्रास

सकाळ वृत्तसेवा

High Blood Pressure : हायपरटेंशन अर्थात उच्च रक्तदाब.. म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये अधिक वेगाने रक्ताचा प्रवाह होत असतो. मागील काही वर्षांत उच्च रक्तदाब वाढलेल्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. चाळीशीत उद्भवणाऱ्या रक्तदाबाचा त्रास आता तरुण पिढीमध्ये देखील दिसून येत आहे. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये याचा त्रास अधिक असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र उच्च रक्तदाब नियंत्रणात आणता येऊ शकतो. (Jalgaon problem of blood pressure is also felt in young generation)

मधुमेहाइतकाच उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण वाढतेय. हा त्रास वाढण्याचे कारण म्हणजे ताणतणाव आहे. संगणकासमोर तासनतास बसून राहिल्याने शरीराची हालचाल मंदावते. तसेच व्यायामही नसल्याने शरीरातील चरबी वाढत जाते. याचा परिणाम स्थूलपणा येतो. परिणामी रक्तदाबाची पातळीही वाढते.

शिवाय मानसिक ताण, व्यायामाचा अभाव, आहारात स्निग्ध पदार्थांचा अधिक वापर, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन उच्च रक्तदाब वाढण्यास मदत करतात. तसेच ताणतणाव, अपूर्ण झोप यामुळे रक्तदाबावर परिणाम होत असतो.

उच्च रक्तदाबाची लक्षणे

रक्तवाहिन्यातून वेगाने अधिक वेगाने रक्ताचा प्रवाह जाणे म्हणजे रक्तदाब असतो. उच्च रक्तदाबामुळे हृदय, डोळे, मेंदू आणि किडनीवर परिणाम होत असतो. अर्थात उच्च रक्तदाब हा लवकर समजून येत नाही. मात्र याचा त्रास होऊ लागल्यानंतर हृदयविकार, मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, पक्षाघाताचा झटका येणे, असे धोके संभवतात. (latest marathi news)

नियंत्रणात आणण्यासाठी

१४० ते ९० हे रक्तदाबाचे प्रमाण शरीराचे संपूर्ण कार्य चांगले राहण्यासाठी योग्य मानले जाते. परंतु उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही पथ्य व आपल्या जीवनशैलीत बदल महत्त्वाचा आहे. तसेच नियमित व्यायाम, धूम्रपान करणे टाळावे, सकस आणि क्षारविरहित आहार, वजन वाढले असेल तर कमी करावे. तसेच रोजचे मिठाचे प्रमाण ६ ग्रॅम अर्थात १ चमच्यापेक्षा कमी असावे.

हे करावे

- भाज्या व फळांचा वापर वाढवावा.

- ज्वारी, बाजरी, चना, राजमा, मसूर डाळ, काली उडीद डाळीचा आहारात समावेश.

- बदाम, आक्रोड, पिस्ता, सूर्यफूल बियांचे सेवन करावे.

- नियमित व्यायाम

- प्रतिदिन मिठाचे प्रमाण ४ ग्रॅमपेक्षा कमी असावे.

"आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनात जगताना उच्च रक्तदाब या आजाराचे प्रमाण वाढले आहे. मात्र यावर नियंत्रण मिळविणे सोपे असून नियमित व्यायाम केल्यास उत्तम राहील. तसेच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी वर्तमान काळात जगावे. यासाठी ध्यान, योगा, प्राणायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. शिवाय आपला ‘डाएट प्लॅन’देखील निश्चित करून घ्यावा." - डॉ. प्रियांका पाटील, एम.डी. इंटेन्सिव्हिस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT