ragging esakal
जळगाव

Jalgaon Ragging Crime: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरचे रॅगिंग! जळगावातून थेट दिल्लीत ऑनलाइन तक्रार

Latest Jalgaon News : तक्रारीची दखल घेत गुरुवारी (ता. २६) महाविद्यालयातील ॲन्टिरॅगिंग समितीने चौकशीला सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या वेगवान हालचाली यासाठी सुरू झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Ragging Crime : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोग विभागातील प्रथम वर्ष पदव्युत्तर (एमडीचे) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे सीनिअर्स विद्यार्थिनींकडून रॅगिंग घेण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनींनी याबाबत थेट दिल्लीच्या ॲन्टिरॅगिंग हेल्पलाइनवर तक्रार केली आहे. दुसऱ्याच दिवशी त्या तक्रारीची दखल घेत गुरुवारी (ता. २६) महाविद्यालयातील ॲन्टिरॅगिंग समितीने चौकशीला सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या वेगवान हालचाली यासाठी सुरू झाल्या आहेत. (Ragging of woman doctor in government medical college)

जळगाव जिल्‍हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. पदव्युत्तर शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी-विद्यार्थिनी आल्या आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडी) स्त्रीरोग विभागातील प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनींची त्यांना सीनिअर असलेल्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनींकडून रॅगिंग घेण्यात आले.

अनेक दिवसांपासून प्रकार

हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचेही तक्रारदाराने नमूद केले असून, सीनिअर विद्यार्थिनींकडून होणारा छळ अधिकच वाढत असल्याने त्याला कंटाळून प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनींनी ‘ॲन्टिरॅगिंग’ हेल्पलाइनवर बुधवारी तक्रार केली. तक्रारीची दखल घेत शासकीय महाविद्यालयातील ‘ॲन्टिरॅगिंग’ समितीला चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. (latest marathi news)

समितीकडून चौकशी

ॲन्टिरॅगिंग समितीने तत्काळ तक्रारीची दखल घेत गुरुवारी सकाळपासूनच चौकशीला सुरुवात केली. या समितीत वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांसह तहसीलदार, महिला पोलिस अधिकारी, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह १४-१५ सदस्यांचा समावेश आहे. प्राप्त तक्रारीनुसार संबंधित विद्यार्थिनींशी व्यक्तिशः माहिती घेऊन रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थिनींची सखोल चौकशी झाल्यावर याबाबतचा अहवाल दिल्लीच्या कार्यालयाला पाठविला जाणार आहे. तक्रार गंभीर असल्यास या प्रकरणी गुन्हाही नोंदविला जाण्याची शक्यता आहे.

पीडितांचे जाबजबाब

ॲन्टिरॅगिंग चौकशी समितीतील सदस्यांनी तक्रारदार विद्यार्थिनींना विश्‍वासात घेऊन त्यांचे लेखी जाबजबाब नोंदवून घेतले. त्यानंतर समितीने ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ॲन्टिरॅगिंग समिती सदस्यांनी दिली.

"तक्रारदार विद्यार्थिनींनी केलेली तक्रार मिळाल्यावरच महाविद्यालय पातळीवर विचारणा होऊन घडल्या प्रकारावर शासन निर्देशानुसार नियुक्त समितीकडे चौकशी सोपविली आहे. त्यांच्या चौकशीतून जे सत्य बाहेर येईल, त्याप्रमाणे पुढील यंत्रणा कारवाई करेल."

- डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

विराट, रोहित यांच्या निवृत्तीला तू जबाबदार? Gautam Gambhir म्हणाला, मागील १८ महिन्यांत माझ्याकडून चुका झाल्या, ज्या...

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Latest Marathi Update : जळगावमधील साईबाबा मंदिरातील भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्यामुळे ७ कामगार जखमी

SCROLL FOR NEXT