Railway Mega Block on Mumbai Up Down Line (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : मुंबई अप-डाउन मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक; मंगळवारी साडेपाच तास राहणार रेल्वे वाहतूक बंद

Jalgaon : चाळीसगाव रेल्वेस्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे कार्य असल्याने मध्य रेल्वेने भुसावळ विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्या १६ एप्रिलला साडेपाच तास बंद ठेवण्यासाठी मेगाब्लॉक घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चाळीसगाव रेल्वेस्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे कार्य असल्याने मध्य रेल्वेने भुसावळ विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्या १६ एप्रिलला साडेपाच तास बंद ठेवण्यासाठी मेगाब्लॉक घेतला आहे. चाळीसगाव स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगसाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालित करणार आहे. (Jalgaon Railway Mega Block on Mumbai Up Down Line)

अप आणि डाउन मार्गांवर सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत भुसावळ विभागात मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन बंद राहील. काही गाड्या रद्द होतील; तर काही गाड्या सुरतमार्गे वळविण्यात येणार आहेत.

उशिराने धावणाऱ्या गाड्या अशा

डाउन : ट्रेन १२७७९ वास्को द गामा- हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस दीड तास उशिराने धावेल. २२४५५ साईनगर शिर्डी- कालका एक्स्प्रेस १५ मिनिटे उशिरा धावेल. १२३३६ लोकमान्य टिळक टर्मिनस– गोड्डा एक्स्प्रेस २० मिनिटे उशिरा, १२५३४ मुंबई-लखनौ एक्स्प्रेस १५ मिनिटे उशिराने धावेल.

अप : ट्रेन क्रमांक ११०७८ जम्मू तवी- पुणे एक्स्प्रेस विभागात सव्वाचार तास उशिरा धावेल. १२७८० हजरत निजामुद्दिन- वास्को द गामा गोवा एक्स्प्रेस विभागात दोन तास २५ मिनिटे, १५०१८ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस विभागात एक तास ४५ मिनिटे. १५९४६ दिब्रुगढ- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस विभागात एक तास ४० मिनिटे उशिराने धावेल. (latest marathi news)

या गाड्यांच्या वेळेत बदल

ता. १६ एप्रिलला पुढील गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. २०१०३ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्स्प्रेस ५.२३ ऐवजी ८.२३ ला सुटेल. १२८५९ मुंबई- हावडा एक्स्प्रेस ६.०० ऐवजी ८.५५ ला सुटेल. २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कँट एक्स्प्रेस ६.०० ऐवजी ९.०० ला सुटेल. १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्स्प्रेस ६.३५ ऐवजी ९.२० ला सुटेल.

मेमू रेल्वे रद्द

११११३ देवलाली- भुसावळ मेमू ही १४ व १५ एप्रिलला रद्द राहील. ११११४ भुसावळ- देवलाली मेमू १४ व १५ एप्रिलला रद्द, १११२० भुसावळ- इगतपुरी मेमू १५ व १६ एप्रिलला रद्द राहील. ११११९ इगतपुरी- भुसावळ मेमू १६ व १७ एप्रिलला रद्द, ११०११ मुंबई- धुळे एक्स्प्रेस मेमू १४ ते १५ एप्रिलला रद्द राहील. ११०१२ धुळे-मुंबई एक्स्प्रेस मेमू १५ ते १६ एप्रिलला रद्द.

०१२११ बडनेरा- नाशिक मेमू १४ ते १६ एप्रिलला रद्द, १२१२ नाशिक- बडनेरा मेमू १४ ते १६ एप्रिलदरम्यान रद्द, ०१३०४ धुळे- चाळीसगाव मेमू १६ एप्रिलला रद्द राहील. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांचे डायव्हर्शन जळगावहून सुरतमार्गे मुंबई करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT