Jalgaon railway Special ticket inspection campaign fine without ticket travel  sakal
जळगाव

जळगाव : 'विनातिकीट' प्रवास करणे पडणार महागात

रेल्वेचे ७५ जणांचे पथक तयार; ३० लाख रुपये दंडवसुलीचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. या फुकट्यांना पायबंद घालण्यासाठी भुसावळ विभागात तिकीट तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी ७५ तिकीट तपासनिसांचे पथक तयार केले आहे. त्यांना दररोज एकूण ३० लाख रुपये दंड वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. तर वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनीही स्वत: महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये अचानक तिकीट तपासणी केली.

लग्नसराई, उन्हाळी सुटीमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यात अनेक जण विनातिकीट, आरक्षण नसताना आरक्षित डब्यातून प्रवास, स्लीपर कोचचे आरक्षण असताना एसी डब्यातून प्रवास करतात. काही प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त लगेज सोबत बाळगतात. यामुळे रेल्वेचे नुकसान होते. शिवाय नियमानुसार तिकीट काढून, आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांना त्रास होतो.

याबाबत ओरड वाढल्याने डीआरएम एस. एस. केडिया, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी भुसावळ विभागात १ मेपासून कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी तिकीट तपासणीसाठी एक स्वतंत्र पथक नेमले. भुसावळातून खंडवा, बडनेरा, मनमाड मार्गावर हे पथक विविध स्थानके, धावत्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अचानक तिकीट तपासणी करते. त्यात नियमबाह्य प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो.

महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये तपासणी

सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये भुसावळ ते बडनेरादरम्यान स्वत: प्रवाशांकडील तिकिट तपासणी केली. सहा तिकीट तपासणीस मदतीला होते. विनातिकीट व नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचे आदेश सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी पथकाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT