Archive photo of a crowd of passengers on Mail-Express trains. esakal
जळगाव

Jalgaon Railway News : 6 महिने आधीच रिझर्व्हेशन का केले? रेल्वेच्या आरक्षित डब्यांतील घुसखोरी वाढली; प्रवाशांना मनस्ताप

Railway News : मध्य रेल्वेच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित डब्यांत सर्वसाधारण तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Railway News : सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने सर्वच रेल्वे गाड्यांना फुल्ल गर्दी आहे. सुट्ट्यांमध्ये गावी जाण्यासाठी प्रवाशांनी चार ते सहा महिने अगोदरच रेल्वेचे आरक्षण करून ठेवले आहे. असे असतानाही आरक्षित डब्यात जनरल तिकीट श्रेणीचे प्रवासी शिरून रिझर्व्हेशन करून सीट मिळविलेल्या प्रवाशांना जागा देण्यावरून वादावादी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. रेल्वेने अशा प्रवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (Jalgaon Encroachment of railway reserved coaches increased)

मध्य रेल्वेच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित डब्यांत सर्वसाधारण तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. त्यांच्याकडून दंड आकारून प्रवासाची मुभा दिली जात आहे. मात्र, या प्रवाशांचा मनस्ताप आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना होत आहे. रेल्वे प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, आरक्षित तिकीट असलेले आणि घुसखोरी केलेल्या प्रवाशांमध्ये वादावादी होत आहे.

सध्या उन्हाळ्याची सुटी व निवडणुकीमुळे पुणे, नागपूर, मुंबईतून दक्षिण, उत्तर भारतात, तसेच राज्याच्या विविध भागांत जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्या खच्चून भरून जात आहेत. आरक्षित डब्यांचे तिकिटे प्रवासी चार ते सहा महिने अगोदरच काढतात.

जनरल डब्यातही पाय ठेवण्यास जागा नसते. त्यामुळे अनेक प्रवासी सर्वसाधारण तिकिटावर आरक्षित डब्यांतून प्रवास करीत आहेत. मात्र, अशा प्रवाशांमुळे आरक्षित डब्यांतील गर्दी वाढत असून, त्याचा फटका आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना बसत आहे. (Latest Marathi News)

तिकीट तपासनीस (टीसी) घुसखोरी केलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल करतात. आरक्षित डब्यात एखादी जागा रिकामी असेल, तर संबंधित प्रवाशाला जागा दिली जाते. मात्र, जागा नसली तरी या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी दिली जाते. आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांना नियमित केल्याने त्यांना जागा न मिळाल्यास हे प्रवासी डब्यात शौचालयालगतच्या दरवाज्यात, जागेत, आसनांच्या मधल्या जागेत बसून प्रवास करतात.

यामुळे डब्यांतील गर्दी वाढत असून, उर्वरित प्रवाशांना डब्यात ये-जा करण्यास अडचणी येतात. यावरून वादावादी होत असून, आम्ही चार ते सहा महिने अगोदर आरक्षण का केले? यासारखे प्रश्न आरक्षित तिकीट काढणारे विचारताना दिसत आहेत.

रोज धावताहेत सातशे गाड्या

मध्य रेल्वे मार्गावर ७०० मेल आणि एक्स्प्रेस धावतात. यासाठी सुमारे अडीच हजार डबे वापरात आहेत. यात एक हजार एसी, ९०० शयनयान आणि ६०० सामान्य डबे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांचं राज्य! ODI World Cup मध्ये दिसणार बदलाचे वारे; ICC च्या ऐतिहासिक निर्णयाचे जगभरातुन कौतुक

Panchayat Raj : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’; गावाच्या विकासासाठी आता मोठी संधी!

Latest Marathi News Updates Live : इचलकरंजीत पाणी प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक

Kalyani Komkar Statement: वनराजच्या डेड बॉडीवर हात ठेवून सांगितलं होतं... आयुष कोमकरच्या आईने काय सांगितलं? Exclusive माहिती

Chhagan Bhujbal: नातेवाईक की नातेसंबंध? दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे; भुजबळांनी सगळं उलगडून सांगितलं

SCROLL FOR NEXT