Robbery  sakal
जळगाव

कंटेनर बंद पाडून चालकानेच टाकला दरोडा

साथीदारासह साडेतीन लाखांचा माल लांबवला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पाचोरा रोडवरील रामदेववाडी (ता. जळगाव) गावाजवळ बंद पडलेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी ट्रकसाठी लागणारे टायर, ट्यूब व इतर साहित्य असा एकूण ३ लाख ३६ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले होते. एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी उलट तपास सुरु केल्यावर कंटेनरचा चालक सलमान खान सलीम खान पठाण (वय २७) सोबत त्याचा साथीदार अमीर शेख नाशिर मणियार (वय- २०, दोन्ही रा. कजगाव, ता. भडगाव) अशांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव येथील एस. के. ट्रान्सलाईन येथील कंपनीच्या मालकीचा (एमएच १९, सीवाय २२८१) कंटेनरला पुण्यातील ब्रिजस्टोन टायर कंपनीचा माल गुहाटी येथे पोहचविण्याची ट्रिप मिळाली होती. बुधवारी (ता. २) कंटेनरचालक सलमान खान सलीम खान पठाण याने पुण्यातील ब्रिजस्टोन टायर कंपनीतून माल भरून गुहाटीकडे रवाना झाला. मालकाचा फोन आल्यावर त्याने मी, भडगाव पोचलो आहे, लगेच जेवण करुन निघतो. असे म्हटल्यावर तो, जळगावच्या दिशेने निघाला. शुक्रवारी (ता. ४) रोजी रात्री १० वाजता कंटनेर घेवून जळगावकडे येत असताना पाचोरा रोडवरील रामदेववाडी गावाजवळ रस्त्यावर त्यांचा कंटेनर बंद पडला. परिणामी चालक सलमान खान सलीम खान पठाण हा चालक, बंद गाडीतच झोपून राहिला. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कंटेनरचे दरवाजाचे सील तोडून ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा माल लंपास केल्याची बतावणी करण्यात आली.

उलट तपासात बोबडी वळली..

चोरी झाल्याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता एस. के. ट्रान्सलाईन (जळगाव)चे मॅनेजर रामदास खैरनार यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी चौकशी सुरु केली. कंटेनरचालक सलमान खान सलीम खान पठाण याला विचारपूस करुन घटनाक्रम विचारण्यात आला. चौकशी दरम्यान सलमानची बोबडी वळेना, घटनाक्रम सांगताना उलटसुलट सांगत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सचिन मुंडे, हेमंत पाटील, स्वप्निल पाटील, प्रदीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांच्या पथकाने सलमानला खाकी दाखवल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार अमीर शेख नाशिर मण्यार याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

चुकीचा मार्ग अन्‌ बोलण्यात फसला

कंटेनर चालक सलमान हा पुण्याहून जळगाव येत होता. तो, दोन दिवसापूर्वीच पोहचणे अपेक्षीत होते. तसेच पुणे महामार्गावरून न येता त्याने वेगळा मार्गाने गाडी आणली. रामदेववाडी गावाजवळ कंटेनर नादुरुस्त झाल्याने त्याने ट्रान्सपोर्टवरुन मॅकेनिक बोलवले. मॅकेनिकला सलमानसोबत इतर देाघे दिसले. मात्र, पोलिस चौकशीत त्याने मी, एकटाच असल्याचे सांगितल्यावर त्याचा पाहुणचार झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT