Crime  esakal
जळगाव

Jalgaon News : सायबरच्या विळख्यात ग्रामीण तरुणाई; पालकांमध्ये चिंता

Jalgaon : बाल लैंगिक अत्याचाराचा ऑनलाइन चालणारा धंदा अर्थात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात सीबीआयने गेल्या वर्षभरात देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली.

सकाळ वृत्तसेवा

धानोरा : बाल लैंगिक अत्याचाराचा ऑनलाइन चालणारा धंदा अर्थात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात सीबीआयने गेल्या वर्षभरात देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यात विशेष म्हणजे ग्रामिण भागातील तरुण जाळ्यात अडकल्याचे पुढे आले. वाढत्या इंटरनेटच्या प्रभावासोबतच सायबर क्राईमच्या घटना या तर आता नित्याच्याच बाबी झाल्या आहेत. (Jalgaon Rural youth in throes of cyber)

रोज कुठे ना कुठे मोबाईल, फेसबुक, इन्स्टाग्राम, आदी सोशल मीडिया साईटवर कोणाची पैशाची फसवणूक किंवा पोर्नोग्राफीच्या आलेल्या लिंक शेअर करून त्यावर पैसे मिळण्याची आमिषाला बळी पडून अनेकांच्या हातात सीबीआय व सायबर क्राईम पथकांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ग्रामीण भागात लोण

आता सोशल मीडिया व स्मार्ट फोनचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून ग्रामीण भागातील तरुण पिढी याच्या व्यसनाधीन झाली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात स्मार्ट फोनचा अतिवापर झाला. यामुळे मुलं चिडचिडी झाली तर काहींनी तर आत्महत्या देखील केल्या. शाळा कॉलेज बंद असल्याने अगदी ज्युनिअर केजी पासून तर कॉलेज मधील मुलांनी स्मार्ट फोनच्या सहाय्याने अभ्यास केला. (latest marathi news)

पालकांनाही कोरोना काळात शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महागडा स्मार्ट फोन घेउन दिला. परंतु मुलं यावर अभ्यास व्यतिरिक्त इतरही काही बाबी करताहेत हे तपासून पाहण्याची तसदी देखील पालकांनी घेतली नाही. परिणामी तरुण पिढी याच्या आहारी गेल्यानं आता पालकांना याची मोठी भीती वाटू लागली आहे.

मार्गदर्शनाची गरज

इंटरनेटच्या माध्यमातून होणारे गुन्हे (उदा. संकेतस्थळ हॅक करणे, अश्लीलतेचा प्रसार करणे, ई-मेल द्वारे फसवणूक, क्रेडिट कार्ड बाबतचे गुन्हे, सॉफ्टवेअर प्रणालीबाबतचे गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक इ.) याबाबत शाळा ,महाविद्यालय आणि संस्थांमध्ये सायबर क्राईम प्रतिबंध जागरूकता कार्यक्रमांची ग्रामीण भागात गरज वाढली आहे. ग्रामीण भागातील तरुणांना सायबर क्राईम बाबत माहिती होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT