prakash kapde esakal
जळगाव

Jalgaon News : तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची डोक्यात गोळी झाडून उचलला टोकाचा पाउल; जामनेर येथील घटना

Jalgaon : पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने बुधवारी (ता. १५) पहाटे येथील जामनेर गणपतीनगरातील निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील अंगरक्षक, राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने बुधवारी (ता. १५) पहाटे येथील जामनेर गणपतीनगरातील निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश गोविंदा कापडे (वय ३७) असे या अंगरक्षकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्रकाश कापडे पंधरा वर्षांपासून राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत होते. ( sachin Tendulkar bodyguard was take extreme step in jamner )

त्यांनी यापूर्वीही मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेही सुरक्षाव्यवस्थेतील अंगरक्षक म्हणून काम केले होते. सध्या ते सचिन तेंडुलकर यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत अंगरक्षक म्हणून तैनात होते. आठवडाभरापूर्वीच ते जामनेर येथील गणपतीनगर भागातील आपल्या निवासस्थानी परतले होते. बुधवारी (ता. १५) पहाटे निवासस्थानीच कापडे यांनी स्वतःच्या आत्मसंरक्षण शस्रातून (सर्व्हिस रिव्हॉल्व्हर) डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली.

गोळीबाराचा आवाज ऐकताच घरात झोपलेल्या कुटुंबीयांनी कापडे यांच्या खोलीकडे धाव घेतली. त्या वेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. ते दृश्य पाहून कुटुंबीय हादरून गेले. मात्र, त्यातून सावरत त्यांनी जामनेर येथील पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. (latest marathi news)

त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत कापडे यांना जळगाव येथील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. कापडे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तसेच तपासानंतर कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. घटनेनंतर कापडे यांच्या निवासस्थानाबाहेर परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली होती. कापडे गोरेगाव (मुंबई) येथे राज्य राखीव पोलिस दलात (एसआरपीएफ) प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT