modi pawar esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : दुसऱ्यांच्या कुटूंबाबद्दल न बोलण्याची भूमिका मोदींनी सोडली, मात्र आपण सोडणार नाही : शरद पवार

Lok Sabha Constituency : दुसऱ्यांच्या कुंटूंबाबद्दल बोलणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी कुठे कुटूंब सांभाळलं, त्यांची कौटुंबिक स्थिती चिंताजनक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Constituency : दुसऱ्यांच्या कुंटूंबाबद्दल बोलणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी कुठे कुटूंब सांभाळलं, त्यांची कौटुंबिक स्थिती चिंताजनक आहे. परंतु त्याबाबत मी बोलू इच्छित नाही, दुसऱ्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल न बोलण्याची भूमिका त्यांनी सोडली असली तरी आपण ती सोडणे योग्य नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. (Modi gave up his stance of not talking about other people families but we will not give up )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबाबत आपलं कुटूंब सांभाळू न शकणारे देश काय सांभाळणार अशी टीका एका मुलाखतीत केली होती. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नााला उत्तर देतांना शरद पवार यांनी दुसऱ्याच्या व्यक्तीगत जीवनाबद्दल मोदी बोलत असले तरी आपण बोलणार नाही असे मत व्यक्त केले.

मोदींबद्दल जनतेत आस्था नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत बोलतांना ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत जनतेत सन २०१४ मध्ये जी आस्था होती ती आता राहिलेली नाही. आता परिस्थिती वेगाने बदलते आहे. त्यांनी अनेक बेछूट विधाने केली आहेत. ज्या गोष्टी पेलविल्या जात नाहीत, त्या सुध्दा ते बोलले आहेत. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्‍वास संपलेला आहे. आज शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे, प्रचंड नाराज आहेत. त्यांच्या नाराजीची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. (latest marathi news)

मोंदीनाच जिंकण्याचा विश्‍वास नाही

नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात घेत असलेल्या सभांबाबत बोलतांना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात पूर्वीसारखे यश मिळेल याचा विश्‍वास नाही त्यामुळे ते पुन्हा-पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. यापूर्वींच्या पंतप्रधानानी असे कधी केल्याचे आठवत नाही.

महाविकास आघाडीला मोठे यश

राज्यात महाविकास आघाडीच्या यशाबाबत बोलतांना शरद पवार म्हणाले, की आजची परिस्थती महाविकास आघाडीला अनुकूल दिसत आहे. गेल्यावेळी राज्यात कॉंग्रेसला एक, आम्हाला चार व एमआयएमला एक अशा सहा जागा विरोधकांना मिळाल्या होत्या. यावेळी कॉंग्रेसला दहा तर आम्हाला आठ ते नऊ जागा मिळतील असा विश्‍वास आहे.

यावेळचे चित्र आणि मागचे याचे चित्र यात जमीन आसमानचा फरक आहे. भाजपने चारशे पारचा दिलेला नारा आता मागे घेतला असून ते २०० पर्यंत आलेले आहेत, निवडणूका पूर्ण होईपर्यंत ते आणखी खाली येतील असे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT