Uddhav Thackeray esakal
जळगाव

Jalgaon News : शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार आज ठरणार; जळगाव लोकसभा

Jalgaon : उद्धव बाळासाहेब ठाकर गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी अकराला शिवसेनेची बैठक होणार आहे. त्यात,जळगाव लोकसभेचा उमेदवार निश्‍चितीबाबत चर्चा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाण्याचे निश्‍चीत झाले असून पक्षाचा उमेदवार ठरविण्यासाठी शनिवारी (ता.९) मुंबईत मातोश्रीवर बैठक होत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकर गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी अकराला शिवसेनेची बैठक होणार आहे. त्यात,जळगाव लोकसभेचा उमेदवार निश्‍चितीबाबत चर्चा होणार आहे. (Jalgaon Shiv Sena Thackeray party candidate will decide today)

बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत आमंत्रित करण्यात आले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे पक्षातर्फे जळगाव महापालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील व पारोळा येथील पक्षाचे जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षाबाहेरील आयात इच्छुकाला उमेदवारीची चर्चा झाली होती.

त्यामुळे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करून उमेदवार निश्‍चीत करणार आहेत. (latest marathi news)

नाशिकला खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक होउन जळगाव लोकसभेच्या उमेदवारीबाबत प्राथमिक चर्चा झाली.

जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंतही उपस्थित होते.या बैठकित झालेल्या चर्चेचा प्राथमिक अहवाल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आला होता. त्यानुसार आता उमेदवारी देण्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. बैठकित दोघांपैकी एक नाव निश्‍चित होणार की आयात उमेदवाराला संधी दिली जाणार याकडे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Donation Scam: "होय, माझी चूक झाली..." चंपत राय यांचा राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पोर्तुगालकडून खेळणार; ICC नियमांची पुर्तता, आता मैदान गाजवण्यास सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळ निवडणुकीपूर्वी सतेज पाटील यांचा शक्तिप्रदर्शन मेळावा, रणनीतीकडे सर्वांचे लक्ष

FDA Action: तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील उपाहारगृहे, हॉटेलचे परवाने रद्द, १९ जण अटकेत; एफडीएची मोठी कारवाई

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे आणखी कठोर शिक्षेस पात्र : न्यायालय

SCROLL FOR NEXT